मांसाहार शिजवून, तसेच मलमूत्र विसर्जित करून गडाचे पावित्र्य केले भंग !
शिवप्रेमींच्या तक्रारीकडे पुरातत्व खात्याचे दुर्लक्ष, पोलिसांकडून कारवाई करण्याऐवजी धर्मांधांच्या अनधिकृत उरूसाला संरक्षण !
- कुठे ५ पातशाह्यांना धूळ चारून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज, तर कुठे त्याच स्वराज्यातील गड-किल्ल्यांचेही धर्मांधांपासून रक्षण करू न शकणारे सरकार !
- गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांना मंडपांची अनुमती न देणारे, उत्सवांत जाचक अटी घालणारे पोलीस-प्रशासन मशिदींवरील भोग्यांवर कारवाई करतांना नरमाईची भूमिका घेते. याचप्रमाणे लोहगडावर दिवाबत्तीसाठी जाणार्या शिवप्रेमींना अडवणारे पुरातत्व खाते उरूस साजरा करण्यासाठी धर्मांधांना उघड सूट देते. हे पालटण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हा त्यावर उपाय होय !
मुंबई, २६ जानेवारी (वार्ता.) – संरक्षित वास्तू म्हणून नोंद असलेल्या पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील लोहगडावर धार्मिक कार्यक्रम करण्याला अनुमती नसतांना ‘हाजी हजरत उमरशावली बाबा रहै. ट्रस्ट’ने या गडावर २१ आणि २२ जानेवारी असे २ दिवस उरूस साजरा केला. पुरातत्व खात्याने ट्रस्टचे अध्यक्ष हुसैन बाबा शेख यांना पाठवलेल्या पत्राला केराची टोपली दाखवून मोठ्या स्वरूपात गडावर उरूस साजरा केला. या वेळी धर्मांधांनी गडावर बोकड कापून उरूसामध्ये मांसाहाराचे जेवण दिले. येथील ‘१६ कोने’ तलावाच्या ठिकाणी रक्ताचा सडा पडला होता. तो तसाच ठेवण्यात आला. गडावर उरूसासाठी आलेल्या सहस्रावधींच्या जमावाने गडावर सर्वत्र मलमूत्र विसर्जित करून गडाचे पावित्र्य भंग केले. याविषयी शिवप्रेमी श्री. विश्वनाथ जावलीकर आणि श्री. दिगंबर पडवळ यांनी पुरातत्व खाते, तसेच लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे आणि तहसीलदार यांच्याकडे १ मास आधी तक्रार करूनही या सर्वांनी याकडे दुर्लक्ष केले. पुरातत्व विभागाने केवळ लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे, जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना पत्र पाठवण्याचा सोपस्कार केला.
प्रत्यक्ष कार्यक्रम चालू असतांना तो होऊ नये, यासाठी कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. उलट अनधिकृतपणे साजर्या करण्यात आलेल्या या उरूसाला ३ दिवस संरक्षण देण्याचा निंदनीय प्रकार लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याने केला. शिवप्रेमींनी कार्यक्रमाला विरोध करू नये, यासाठी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे २० ते २५ पोलीस उरूसाच्या ठिकाणी उभे होते. (अनधिकृत उरूसाच्या विरोधात शिवप्रेमींनी पोलिसांत तक्रार करूनही उरूसाला संरक्षण देणारे पोलीस कायद्याचे पालन करणार्यांसाठी आहेत कि अनधिकृत काम करणार्या धर्मांधांच्या रक्षणासाठी ? पोलीस कुणाचे पगारी नोकर आहेत ? अनधिकृत कार्यक्रमाच्या विरोधात कारवाई न करता त्याला संरक्षण देणार्या पोलिसांचे अन्वेषण होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
इतिहासात लोहगडाला असलेले महत्त्व !
इतिहासामध्ये लोहगडाचा उल्लेख आवर्जून अशासाठी होता की, जेथे गडाच्या नियमानुसार गडाचा मुख्य दरवाजा सायंकाळी बंद करण्यात आल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेनेही किल्लेदाराने तो उघडला नाही. त्यामुळे महाराजांना रात्रभर गडाच्या बाहेर रहावे लागले होते. स्वराज्याच्या काळापासून या गडाचे महाद्वार सायंकाळी ७ वाजता बंद करण्याचा नियम आहे. पूर्वापार चालत आलेली ही शिवकालीन प्रथा उरूसाच्या कालावधीत पायदळी तुडवून गडाचा मुख्य दरवाजा रात्रंदिवस उघडला जातो. विशेष म्हणजे मागील २ वर्षे त्रिपुरारी पौर्णिमा, दिवाळी, दसरा या सणांच्या वेळी गडावर दीपोत्सव आणि दिवाबत्ती करण्यासाठी जाणार्या शिवप्रेमींना हा नियम दाखवून गडावर सोडले जात नाही. मागील वर्षी उरूसाच्या कालावधीत गडावर विजेची सोय करण्यासाठी गडावर विद्युत्जनित्र (जनरेटर) देण्यात आले होते. या वेळी मात्र गडाच्या खालून गडावर विद्युतवाहिनी नेऊन वीज घेण्यात आली होती.
उरूसाला आलेल्या धर्मांधांनी गडावरील महाद्वारांना असलेली हिंदूंच्या देवतांची नावे घासून खोडली !
गडाच्या मुख्यद्वारांना असलेली ‘गणेश दरवाजा’, ‘हनुमान दरवाजा’, ‘नारायण दरवाजा’, ही नावे उरूसाला आलेल्या धर्मांधांनी घासून खोडली आहेत. त्यामुळे या दरवाजांच्या पाटीवर देवतांची नावे जाऊन केवळ ‘दरवाजा’ हाच शब्द राहिला आहे. धर्मांधांनी गडावरील त्रिबंक तलावाच्या पाटीवरील ‘त्रिबंक’ हे नाव खोडले आहे. तसेच गडावरील शिवाच्या मंदिराच्या नावाचा फलक गायब केला आहे. (यावरून धर्मांधांमध्ये किती हिंदुद्वेष भिनला आहे, हे दिसून येते. सर्वधर्मसमभावाच्या गोष्टी करणार्यांनी हे लक्षात घ्यावे ! छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे शासनकर्ते असते, तर धर्मांधांनी असे धाडस केले असते का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
स्वराज्याची संपत्ती ठेवण्याच्या लक्ष्मी कोठीला शौचालयाचे स्वरूप
स्वराज्याची संपत्ती गडावरील ज्या लक्ष्मी कोठीमध्ये ठेवली जात होती, त्या कोठीमध्ये उरूसाच्या कालावधीत मलमूत्र विसर्जित केल्यामुळे त्याला अक्षरश: शौचालयाचे स्वरूप आले आहे. या ठिकाणी इतकी घाण करण्यात आली आहे की, दुर्गंधीमुळे तेथे जाणेही कठीण झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरतेहून आणलेली संपत्ती याच कोठीत ठेवली होती.
गडावरील कोठींमध्ये आढळले निरोध आणि मद्याच्या बाटल्या
गडाच्या आतल्या भागात असलेल्या कोठींमध्ये निरोध (कंडोम) आणि मद्याच्या रिकाम्या बाटल्या आढळल्या आहेत. यावरून या कोठ्यांमध्ये अनैतिक प्रकार झाले असल्याचे दिसून येत आहे.
उरूसाच्या रक्षणासाठी आयोजकांनी आणले लाठीधारक
वर्ष २०१८ मध्ये काही स्थानिक शिवप्रेमींनी या उरूसाला विरोध केला होता. त्यामुळे यावर्षी आयोजकांनी उरूसाच्या ठिकाणी काही लाठीधारक आणले होते.
(यातून धर्मांधांचा उद्दामपणा आणि कायदा अन् सुव्यवस्था यांचा मान न राखण्याची देशविघातक वृत्ती दिसून येते. अशा धर्मांधांपासून पोलीस हिंदूंचे रक्षण करतील या भ्रमात न रहाता हिंदूंनी स्वत:चे रक्षण करण्यासाठी सिद्ध व्हावे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
आयोजकांना केवळ पत्र पाठवण्याचा पुरातत्व विभागाने केला सोपस्कार
येथील श्री. विश्वनाथ जावलीकर यांनी पुरातत्व विभागाला पत्र पाठवून लोहगडावर उरूस-ए-शरीफ साजरा करण्यात येणार असल्याची पूर्वकल्पना दिली होती. त्यावर पुरातत्व विभागाने १३ डिसेंबर २०१८ या दिवशी उरूसाचे आयोजक हाजी हजरत उमरशावली बाबा रहै. ट्रस्टचे अध्यक्ष हुसैन बाबा शेख यांना पत्र पाठवले. या पत्रामध्ये ‘लोहगड हा ‘लिव्हिंग मोनुमेन्टस्’च्या श्रेणीत येत नसल्यामुळे लोहगड गुंफा परिसरात कोणत्याही प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यास अनुमती देता येणार नाही. तसे केल्यास ते दंडनीय ठरेल’, असे पत्र पाठवून केवळ सोपस्कार केला आहे. त्याची प्रत पुरातत्व विभागाने पुण्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक (ग्रामीण), लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांसह श्री. विश्वनाथ जावलीकर यांनाही पाठवली. हा उरूस साजरा होत असतांना मात्र पुरातत्व विभागासह लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे किंवा तहसीलदार यांपैकी कुणीही त्यांना अटक केली नाही किंवा कोणतीही कायदेशीर कारवाई केली नाही. (कथित आरोपांवरून हिंदूंना वर्षानुवर्षे पोलीस कोठडीत अडकवणारे पोलीस आणि प्रशासन धर्मांधांपुढे कसे नांगी टाकतात, हे यातून दिसून येते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
पुरातत्व खात्याचे अधिकारी म्हणतात ‘तुम्हीच कार्यक्रम थांबवा !’
याविषयी श्री. विश्वनाथ जावलीकर यांनी ‘दैनिक सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींना माहिती देतांना सांगितले, ‘‘मी पुणे येथील पुरातत्व विभागाचे अधिकारी गजानन मांढिवरे यांना दूरभाषवरून संपर्क केला होता; मात्र ते म्हणाले, ‘‘आम्ही पोलिसांना सांगितले आहे. त्यांनी कारवाई करायला हवी होती. आता तुम्हीच ५० ते १०० जणांना घेऊन हा कार्यक्रम थांबवायला हवा होता. तुम्ही याविषयी वरिष्ठ पोलिसांकडे तक्रार करा.’’ (असे आहे, तर पुरातत्व खाते नावाचा पांढरा हत्ती का पोसावा ? ऐतिहासिक वास्तूंचे जतन करू न शकणारे पुरातत्व खाते विसर्जित करा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
पोलीस आणि प्रशासन यांचे हे कारस्थान ! – विश्वनाथ जावलीकर, शिवप्रेमी, मावळ
या किल्ल्याचा दरवाजा उघडण्यासाठी स्वत: छत्रपती शिवाजी महाराज यांनी आदेश दिल्यावरही किल्लेदाराने दरवाजा न उघडता नियमाचे पालन केले. त्याच किल्ल्याचा दरवाजा स्वराज्याचा नियम डावलून काही बुणग्यांसाठी उघडला जात आहे, हे संतापजनक आहे. शासनाच्या लेखी आदेशाला डावलून या गडावर उरूसाचा कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हाधिकारी, पोलीस, तहसीलदार यांना याविषयी पाठवलेल्या पत्राला केराची टोपली दाखवली. पुरातत्व विभाग हा कार्यक्रम अनधिकृत असल्याचे सांगत असतांना दुसरीकडे लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस कार्यक्रमाचे रक्षण करण्यासाठी उभे रहातात. एकीकडे मनाई करायची आणि दुसरीकडे संरक्षण करायचे. शिवप्रेमींना द्विधा मनस्थितीत ठेवण्याचे पोलीस आणि प्रशासन यांचे हे कारस्थान आहे.
पुरातत्व विभाग, पोलीस आणि प्रशासन यांच्या कारभाराविषयी संशय
लोहगडावर अवैधपणे होणारा हा उरूसाचा कार्यक्रम होऊ देऊ नये, यासाठी स्थानिक शिवप्रेमी २ वर्षांपासून पुरातत्व विभाग, लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे, तहसीलदार यांच्याकडे तक्रार करत आहेत; मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. उलट पोलीस शिवप्रेमींवरच दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. या सर्वांच्या कारभाराविषयी स्थानिक शिवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे.
स्थानिक राजकीय पक्षांच्या पदाधिकार्यांकडून शिवप्रेमींवर अप्रत्यक्ष दबाव
स्वत:ला हिंदुत्वनिष्ठ पक्षाचे पदाधिकारी म्हणवणार्या काही स्थानिक पक्षाच्या नेत्यांकडून गडाच्या ठिकाणी उरूसाच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देणारे फलक लावण्यात आले आहेत, तसेच या राजकीय नेत्यांकडून ‘शिवप्रेमींनी कार्यक्रमाला विरोध करू नये’, यासाठी दबाव आणला जात असल्याचे काही शिवप्रेमींनी सांगितले. (राजकीय स्वार्थासाठी हिंदुत्वाला बगल देणारे, असे राजकीय नेते कधीतरी हिंदूंचे हित साधतील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
लोहगडावर अनधिकृतपणे होणार्या या उरूसाच्या विरोधात शिवप्रेमींनी तक्रार करूनही आणि याविषयी सातत्याने पाठपुरावा करूनही पुरातत्व विभाग आणि पोलीस यांनी यावर कारवाई केलेली नाही. त्यामुळे या यंत्रणांवर कोणाचा राजकीय दबाव आहे ? त्या धर्मांधांना घाबरत आहेत का? कि त्या विकल्या गेलेल्या आहेत ?, असे प्रश्न शिवप्रेमींकडून उपस्थित करण्यात येत आहेत.
पोलिसांनी कारवाई का केली नाही, याविषयी माहिती घेऊन पुढील कारवाई करू ! – बिपीन चंद्र, अधीक्षक, मुंबई पुरातत्व विभाग
या प्रकरणी ‘दैनिक सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने मुंबई पुरातत्व विभागाचे अधीक्षक बिपीन चंद्र यांची भेट घेतली असता ते म्हणाले, ‘‘लोहगडावर उरूस साजरा झाल्यास कारवाई करण्यात यावी, यासाठी आम्ही लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याला पत्र पाठवले होते. यापुढे कारवाई करण्याचे दायित्व पोलिसांचे आहे. लोहगडावर उरूस झाला का, याविषयी अद्याप आमच्याकडे माहिती आलेली नाही. तुमची याविषयीची लेखी तक्रार द्या. त्यावर आम्ही पोलिसांना पत्र पाठवून कारवाई का केली नाही, याचे कारण मागू.’’ (पुरातत्व विभाग गडांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यास किती संवेदनशील आहे, हेच या उत्तरातून दिसून येते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात