इस्रायली गुरु पू. नारद ऋषी यांच्या मडिकेरी (कर्नाटक) येथील समाधीचा लोकार्पण सोहळा

पू. नारद ऋषी यांची समाधी म्हणजे भारत आणि इस्रायल यांच्यातील आध्यात्मिक संबंधाचा प्रारंभ ! – सुरेंद्र जैन, आंतरराष्ट्रीय संयुक्त महासचिव, विश्‍व हिंदु परिषद

डावीकडून सर्वश्री रमेश शिंदे, अर्जुन संपथ, सुशील पंडित, शिवराम मालवल्ली, सुरेंद्र जैन, प्रसून मैत्रा आणि रवि कुमार

मडिकेरी (कर्नाटक) : भारतातील हिंदूंना आज देशातील विविध भागांत अत्याचारांना सामोरे जावे लागत आहे, ही चिंताजनक गोष्ट आहे. भारत आणि इस्रायल यांच्यातील संबंध दृढ होतेच; मात्र त्याला आज आध्यात्मिक जोड मिळाली आहे. त्यामुळे पू. नारद ऋषी यांची समाधी म्हणजे भारत आणि इस्रायल यांच्यातील आध्यात्मिक संबंधाचा प्रारंभ आहे, असे प्रतिपादन विश्‍व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय संयुक्त महासचिव श्री. सुरेंद्र जैन यांनी केले. इस्रायली गुरु पू. नारद ऋषी (इतमार ओरेन) यांच्या गोनीकोप्पा, मडिकेरी, कर्नाटक येथील समाधीचा लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी पू. नारद ऋषी यांचे इस्रायल, तसेच भारत येथील शिष्यगण आणि भक्तपरिवार यांना आमंत्रित करण्यात आले होते, तसेच राष्ट्र आणि हिंदु धर्म यांच्या कार्यात सक्रीय असणारे देश-विदेशातील २०० हून अधिक मान्यवरही या कार्यक्रमास उपस्थित होते. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून हिंदु स्वयंसेवक संघाचे आंतरराष्ट्रीय सह-समन्वयक श्री. रविकुमारजी, रूटस् इन कश्मीरचे श्री. सुशील पंडित, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, बंगाल येथील हिंदु संहतीचे प्रवक्ते श्री. प्रसून मैत्रा, बेंगळुरू-सॅन फ्रान्सिस्को शहर मैत्री संघटनेचे अध्यक्ष प्रा. शिवराम मालवल्ली आणि हिंदु मक्कल कत्छीचे अध्यक्ष श्री. अर्जुन संपथ हे उपस्थित होते.

हिंदु स्वयंसेवक संघाचे आंतरराष्ट्रीय सह-समन्वयक श्री. रविकुमारजी यांनी  भारत आणि इस्रायल यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याची आवश्यकता व्यक्त केली. त्यांनी वर्ष १९१८ मध्ये इस्रायलींना हायफा शहर तुर्कांच्या कह्यातून मुक्त करण्यासाठी भारतीय सैन्याने केलेले साहाय्य आणि गाजवलेला पराक्रम यांचे स्मरण करून दिले. मैसूरू आणि जयपूर येथील महाराजांनी यासाठी साहाय्य उपलब्ध करून दिले होते.

बंगाल येथील हिंदु संहतीचे प्रवक्ते श्री. प्रसून मैत्रा यांनी संपूर्ण देशभरात हिंदूंची लोकसंख्या वेगाने अल्प होत असल्याविषयी चिंता व्यक्त केली. इस्रायलला भूतकाळात भारताने केलेल्या साहाय्याचे केवळ कौतुक करत बसू नका, तर त्यांनी त्यानंतरच्या स्थितीत अत्याचारांना तोंड कसे दिले, त्या स्थितीतही त्यांनी स्वतःतील राष्ट्रप्रेम आणि वीरवृत्ती कशी जागृत ठेवली, हेही हिंदूंनी त्यांच्याकडून शिकण्याचे आवाहन श्री. मैत्रा यांनी केले.

हिंदु मक्कल कत्छीचे अध्यक्ष श्री. अर्जुन संपथ यांनी भारत आणि इस्रायल या दोन्ही देशांत आतंकवाद पसरवणारा इस्लाम हा समान शत्रू आहे. त्यामुळे त्याच्याशी लढण्यासाठी या दोन्ही देशांनी एकमेकांना साहाय्य करण्याची आवश्यकता व्यक्त केली.

भारतात हत्याकांडे घडवून आणणारेच आज भारतावर असहिष्णुतेचा खोटा आरोप करत आहेत ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

‘अतिथी देवो भव’ परंपरा असणार्‍या भारतात धन-संपत्ती लुटण्यासाठी आक्रमकांनी शिरकाव केला आणि भारतात हत्याकांडे घडवून आणली. असे लोक आज भारतावर असहिष्णुतेचा खोटा आरोप करत आहेत. टिपू सुलतानाने कुर्ग समाजावर केलेल्या निर्घृण अत्याचारांचे वर्णन त्याने स्वतः वर्ष १७८७ या वर्षी श्रीरंगपट्टणम् येथील मशिदीत शिलालेखावर लिहून ठेवले आहे. त्यात तो म्हणतो की, ‘‘जुना करार मानणार्‍या काफीर ‘ज्यू’ समाजाच्या हृदयात जशी महंमद पैगंबर यांनी दहशत निर्माण केली होती, तशीच दहशत मी कूर्ग येथील कोडवा समाजाच्या हृदयात अल्लाच्या मर्जीनुसार निर्माण केलेली आहे. ७०० ते ९०० जणांना ठार मारले असून त्यांच्या बायका आणि मुले यांना मी गुलाम बनवले आहे. सहस्रो जणांचे बलपूर्वक धर्मांतर केले आहे. त्यांची भूमी, गायी, घरे आणि सर्व संपत्ती आता अल्लाच्या मर्जीनुसार माझी झाली आहे.’’ अशा क्रूर टिपू सुलतानाची जयंती आज मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते; मात्र या सर्व अत्याचारांना तोंड देऊनही ज्याप्रमाणे ज्यू समाजाने इस्रायलसारखे स्वाभिमानी राष्ट्र उभे केले आहे, तशाच हिंदु राष्ट्रासाठी आज हिंदु समाजाने एक होणे आवश्यक आहे.’’

काश्मिरी हिंदूंना ३ दशकांपासून निर्वासितांचे जीवन जगावे लागणे, ही खरी असहिष्णुता आहे ! – सुशील पंडित, रूटस् इन कश्मीर

‘रूटस् इन कश्मीर’चे श्री. सुशील पंडित यांनी काश्मिरी हिंदूंना न्याय मिळण्यासाठी सर्वत्रच्या हिंदूंनी संघटित होण्याची आवश्यकता व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘आज हिंदूंवरच अन्याय होत असतांना देशात असहिष्णुता वाढत असल्याचा अपप्रचार काही विदेशी हस्तकांना विकली गेलेली प्रसारमाध्यमे आणि विचारवंत करत आहेत. त्याला उत्तर देण्यासाठी हिंदु समाज आणि संघटना आमच्या देशात असहिष्णुता नसल्याचा प्रचार करत आहेत; मात्र प्रत्यक्षात इस्लामिक जिहादमुळे वाढत असलेल्या असहिष्णुतेचा कोणी उल्लेख करत नाही. काश्मीरमधील जिहादसाठी काश्मिरी हिंदूंची हत्याकांडे घडवण्यात आली, त्यांचा वंशविच्छेद करण्यात आला, त्यांना ३ दशकांपासून काश्मीरमध्ये परतण्यापासून रोखले जात आहे आणि स्वतःच्या मायभूमीत त्यांना निर्वासितांचे जीवन जगावे लागत आहे. ही खरी असहिष्णुता आहे.’’

क्षणचित्र

पू. नारद ऋषींच्या इस्रायल येथून आलेल्या भक्तांनी स्वामी मुक्तानंदरचित भजने म्हटली.

इस्रायली गुरु पू. नारद ऋषी (इतमार ओरेन) यांच्या कर्नाटक राज्यातील समाधीस्थळाचे लोकार्पण

इस्रायल हा भारताचा धोरणात्मक नीतीसंबंध आणि व्यापार या क्षेत्रांतीलच नव्हे, तर सांस्कृतिक क्षेत्रातील खोलवर रुजलेल्या मूळांच्या दृष्टीनेही निकटचा मित्र देश आहे. अनेक दशकांपासून इस्रायली नागरिकांना भारताच्या संदर्भात प्रेम आणि आत्मीयता वाटत आलेली आहे. याच आत्मीयतेतून आता भारत-इस्रायलचे आध्यात्मिक नाते निर्माण होण्यास प्रारंभ झाला आहे. याता इस्रायली गुरु पू. नारद ऋषी (इतमार ओरेन) यांनी आध्यात्मिक क्षेत्रात केलेल्या कार्याचा महत्त्वाचा वाटा आहे. पू. नारद ऋषी (इतमार ओरेन) यांचा जन्म १९४५ या वर्षी येमेन देशात झाला. इस्रायलच्या निर्मितीनंतर १९४९ या वर्षी ते इस्रायल देशात परतले. त्यांना ‘गिटार’ वाद्य वाजवण्याची रुची असल्याने त्यांनी ‘गिटारीस्ट’ म्हणून काम केले. त्यानंतर गणेशपुरी (ठाणे) येथील प्रसिद्ध संत स्वामी मुक्तानंद यांच्या शिकवणीचा त्यांच्या मनावर प्रभाव पडून ते आध्यात्मिक मार्गाकडे ओढले गेले. स्वामी मुक्तानंद यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी साधना चालू केली आणि त्यांच्या विदेशातील आश्रमात ते राहू लागले. पुढे त्यांनी सर्व ऐहिक गोष्टींचा त्याग केला आणि ते गणेशपुरी येथील आश्रमात येऊन स्वामी मुक्तानंद यांच्या देखरेखीखाली साधना करू लागले. ‘इतमार ओरेन’ या लौकिक नावाचा त्याग करून त्यांनी ‘नारद ऋषी’ असे नवीन नाव धारण केले. यानंतर त्यांनी वेदान्त आणि काश्मिरी शैव दर्शन यांच्या अध्ययनासाठी अन् प्रसारासाठी जीवन वाहून घेतले. तसेच त्यांनी श्रीमद्भागवत, उपनिषदे, महाभारत, रामायण यांतील शिकवणीप्रमाणे योगमार्गाचा अवलंब केला. भारतीय प्राचीन परंपरा आणि संस्कृती मुकुटातील अनमोल कोंदणाप्रमाणे असल्याचे सांगून त्यांनी त्यांचा प्रचार चालू केला. समाजाला दारू, धूम्रपान, अमली पदार्थ यांच्या व्यसनाच्या विळख्यातून सोडवण्यासाठीही त्यांनी अथक प्रयत्न केले. त्यांच्या या कार्यामुळे इस्रायल, अमेरिका इत्यादि देशांत अनेकांनी त्यांचे शिष्यत्व स्वीकारले.

पू. नारद मुनींनी आपले जीवन ‘सोहऽम योगा’च्या प्रसारासाठी वाहून घेतले आणि सहस्रो जणांना आध्यात्मिक स्तरावर साहाय्य केले. २४ एप्रिल २०१२ या दिवशी देहत्याग करेपर्यंत त्यांचे समाजोद्धाराचे हे कार्य चालूच होते. भारतात हिंदु पद्धतीने समाधी घेण्याची त्यांची अंतिम इच्छा होती. ती इच्छा त्यांच्या शिष्यांनी पूर्ण केली.

Related Tags

कार्यक्रमहिंदु जनजागृती समितीहिंदु संघटना आणि पक्ष

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​