एका केंद्रीय मंत्र्यालाच अशी मागणी करावी लागणे, हे सरकारसाठी लज्जास्पद ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
नवी देहली : राष्ट्राप्रती स्वतःचे कर्तव्य म्हणून पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातली पाहिजे, असे प्रतिपादन गायक तथा भाजपचे केंद्रीयमंत्री बाबुल सुप्रियो यांनी येथे केले. सुप्रियो पुढे म्हणाले, भारत आणि पाक यांच्यात तणाव वाढत आहे. पाकिस्तानी कलाकारांचा ते पाकिस्तानी असणे, हाच गुन्हा आहे. त्यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीतील कुणीही त्यांच्याशी संपर्क ठेवू नये. वेलकम टू न्यूयॉर्क या आगामी चित्रपटात पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांचे गाणे आहे. मी या चित्रपटाच्या निर्मात्यांकडे मागणी करतो की, त्यांनी राहत फतेह अली खान यांच्या आवाजातील हे गाणे काढून टाकून ते अन्य गायकांकरवी म्हणवून घ्यावे. आपण रेडिओवर पाकिस्तानी गायकांचे गाणे ऐकत आहोत आणि वृत्तवाहिन्यांवर मात्र पाकिस्तानी सैन्याच्या आक्रमणात भारतीय सैनिक हुतात्मा झाल्याचे वृत्त पहात आहोत, असे कदापि होऊ नये.
मला राहत फतेह अली खान यांच्याविषयी आक्षेप नाही; मात्र त्यांच्या नागरिकतेविषयी आक्षेप आहे. भारतीय चित्रपटसृष्टी जगभरात भारताचे प्रतिनिधित्व करते; म्हणून भारतीय कलाकारांनी पाकच्या कलाकारांवर बहिष्कार घालून पाकद्वारे पसरवण्यात येणार्या आतंकवादास विरोध दर्शवला पाहिजे. भारतीय चित्रपटसृष्टीमुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या एकाही पाकिस्तानी कलाकाराने कधी भारतावर होणार्या आक्रमणांच्या विरोधात पाकचा साधा निषेधही केलेला नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात