‘पद्मावत’ चित्रपटात खिलजीची भूमिका करणारे अभिनेते रणवीर सिंह
एका अभिनेत्याने सांगितलेल्या या अनुभवातून खिलजी किती क्रूर होता, हे लक्षात येते ! अशा क्रूरकर्म्याचे उदात्तीकरण करणे म्हणजे हिंदूंसाठी संकटाप्रमाणे आहे ! – सम्पादक, दैनिक सनातन प्रभात
मुंबई : ‘पद्मावत’ चित्रपटात अलाउद्दीन खिलजीची भूमिका साकारणारे अभिनेते रणवीर सिंह यांनी चित्रीकरणाच्या वेळी आलेले भयावह अनुभव नुकतेच सांगितले आहेत. ‘पद्मावत’ चित्रपटात अलाउद्दीन खिलजीची भूमिका साकारण्याच्या काळात समोरील एखाद्याने चूक केली, तर त्याचा गळा दाबायची इच्छा व्हायची’, असे सांगितले.
श्री. रणवीर सिंह यांनी पुढे सांगितले की, अलाउद्दीन खिलजीच्या भूमिकेसाठी मी पुष्कळ घाबरलो होतो. भूमिकेला न्याय देऊ शकेन का, याविषयीची मनात भीती होती. ही भूमिका साकारतांना मला काळ्या दलदलीत उतरावे लागणार, याची पूर्ण कल्पना होती; पण मीच अलाउद्दीन खिलजीची भूमिका साकारावी, असा संजय लीला भन्साळी यांचा अट्टाहास होता. मी प्रतिदिन १२ ते १४ घंटे चित्रीकरण करायचो. त्या वेळी अलाउद्दीन खिलजीच्या ‘झोन’मध्ये गेलो होतो. माझ्या अंगात केवळ वाईट प्रवृत्ती भरली होती. मी माझे कुटुंबीय आणि मित्र यांच्याशी बोलणे बंद केले होते. चित्रपटाच्या चित्रीकरणानंतर पुन्हा रणवीर व्हायला आणि मी माझ्या आईशी बोलायला प्रारंभ केला. मित्रांशी बोलायला प्रारंभ केला. खिलजीच्या भूमिकेत मी इतक्या खोलात उतरलो होतो की, माझ्या मनात त्याच्यासारखेच विचार यायचे. कधीकधी चित्रीकरण करत नसतांनाही माझ्या मनात खिलजीसारख्या भावना निर्माण व्हायच्या.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात