देहलीतील ‘पुराना किला’चे बांधकाम शेर शहा सुरी याने केले नसल्याचे उघड !

‘पुराना किला’ ही पांडवांची इंद्रप्रस्थ राजधानीच असल्याचे स्पष्ट

उत्खननात हे बांधकाम ख्रिस्तपूर्व तिसर्‍या शतकात झाले असल्याचेही समोर आले

  • यावरून इस्लामी आक्रमणकर्त्यांनी केवळ मंदिरेच उद्ध्वस्त करून तेथे मशिदी बांधल्या, असे नव्हे, तर भारतीय संस्कृतीच्या प्राचीन वास्तूही नष्ट करून तेथे  त्यांच्या नावाच्या वास्तू निर्माण केल्याचे स्पष्ट होते ! आक्रमकांनी हिंदूंच्या बळकावलेल्या वास्तू परत मिळवून त्याला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
  • इस्लामी आक्रमकांनी बळकावलेल्या हिंदूंच्या वास्तू स्वातंत्र्यांच्या ७० वर्षांनंतरही हिंदूंना परत मिळवून देऊ न शकणे, आतापर्यंतच्या शासनकर्त्यांसाठी लज्जास्पद ! यास्तव हिंदु राष्ट्रच हवे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

नवी देहली : येथील मध्यवर्ती भागात ‘पुराना किला’ (जुना किल्ला) नावाची वास्तू पडक्या स्थितीत आहे. पुरातत्व खात्याच्या नोंदीप्रमाणे ‘पुराना किला वास्तूची निर्मिती सोळाव्या शतकात (वर्ष १५४५ मध्ये) सुरी साम्राज्याचा संस्थापक शेर शहा सुरी याने केलेली आहे’, असा प्रवाद होता. तथापि पुरातत्व विभागाने या वास्तूत वर्ष २०१३-१४ पासून चालू केलेल्या उत्खननात ही मूळ वास्तू ख्रिस्तपूर्व तिसर्‍या शतकात बांधण्यात आली असल्याचे आढळून आले. (यावरून यामागे हिंदु धर्म आणि संस्कृती भारतातून समूळ उखडून तेथे इस्लामी राजवट स्थापन करण्याचे प्रयत्न अगदी प्राचीन काळापासून चालू होते, हेही उघड होते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

उत्खननात १२व्या शतकातील सापडलेली श्री विष्णूची मूर्ति

पुरातत्व विभागाचे प्रकल्प संचालक श्री. वसंत स्वर्णकार म्हणाले, ‘‘आतापर्यंत पुरातत्व विभागाने केवळ ११ मीटर खोलीपर्यंतच उत्खनन केले असून त्यात सापडलेल्या प्राचीन वस्तूंवरून वरील निष्कर्ष आम्ही काढू शकलो. यापुढे तेथील शेवटचा मातीचा ढिगारा उपसण्याचे कार्य प्रगतीपथावर आहे. हे संपल्यावर ही वास्तू एक पर्यटनस्थळ म्हणून घोषित करून त्याद्वारे भारतीय आणि देहली शहराच्या संस्कृतीची सलगता जगासमोर सादर करण्यात येईल.’’

पुरातत्व विभागानेही ‘वरील वास्तूचे वर्णन करतांना ती मौर्य साम्राज्याच्याही आधी निर्माण झाली असून ती महाभारतकालीन पांडवांची इंद्रप्रस्थ राजधानी होती आणि तेथे मोठे शहर वसले होते’, असे नमूद केले आहे. या आधीही वर्ष १९५४-५५ आणि १९६९-७२ या कालावधीत पुरातत्व विभागाचे संचालक श्री. बी.बी. लाल यांनी तेथे उत्खनन केले होते. श्री. लाल यांच्या मतेदेखील ही वास्तू पांडवांची इंद्रप्रस्थ राजधानीच होती. (स्वातंत्र्यानंतरच्या काळात तत्कालीन काँग्रेस सरकारचे हिंदु संस्कृती नष्ट करण्याचे एककलमी धोरण असल्याने श्री. लाल यांचे कुणी ऐकले नाही, यात आश्‍चर्य ते काय ? ज्या काँग्रेसने श्रीरामाला आणि रामसेतूला ‘काल्पनिक’ म्हटले त्यांच्याकडून अजून काय अपेक्षा असणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

वर्ष २०१४ मध्ये देहली विकास प्राधिकरणाने ‘पुराना किला’ वास्तूच्या सभोवतालची ८०० एकर जागा ‘दिनपन्हाह पुराणवस्तू संशोधन बाग’, असे इस्लामी नाव देऊन आरक्षित करण्याचे ठरवले होते; मात्र पुरातत्व विभाग आणि सांस्कृतिक मंत्रालय यांनी त्यास विरोध करून हे नाव ‘इंद्रप्रस्थ पुराणवस्तू संशोधन बाग’, असे ठेवण्याविषयी सुचवले होते. (हा पालट भाजपच्या शासनकाळात तरी होईल, अशी अपेक्षा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related Tags

इतिहासाचे विकृतीकरणराष्ट्रीय

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​