पोलिसांच्या चेतावणीनंतर भित्तीपत्रक हटवले !
कोची : श्री केरळ वर्मा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नव्यानेच प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांचे भित्तीपत्रकासह स्वागत करण्याचा निर्णय घेतला. म.फि. हुसेन यांनी काढलेल्या देवी सरस्वतीच्या चित्राची प्रतिमा असलेले एक भित्तीपत्रकही लावण्यात आले होते. या घटनेच्या मागे महाविद्यालयाच्या साहाय्यक प्राध्यापक दीपा निशांत या असल्याने सामाजिक संकेतस्थळावर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. दीपा निशांत यांनी पूर्वी गोमांस उत्सव साजरा करण्यासाठीही साहाय्य केले होत. (अशा महाविद्यालयात असे प्राध्यापक असल्यावर विद्यार्थ्यांवर कसे संस्कार होत असतील याची कल्पनाच करवत नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
विद्यार्थ्यांनी ही गोष्ट पोलिसांच्या लक्षात आणून दिल्यानंतर पोलिसांनी महाविद्यालयास चेतावणी दिली की, त्यांनी भित्तीपत्रक काढून न टाकल्यास महाविद्यालयावर गुन्हा नोंदवण्यात येईल. त्यानंतर भित्तीपत्रक काढून टाकण्यात आले. पोलिसांनी मात्र याविषयी सांगितले की, आम्हाला सामाजिक संकेतस्थळावरून संदेश आल्याने याची माहिती मिळाली, त्यानंतर आम्ही महाविद्यालयात गेलो; पण तेथे हुसेन यांची कलाकृती नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांविरोधात खटला दाखल केला नाही. (केरळ पोलिसांची विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठीची चलाखी ! कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यात कधीतरी हिंदुद्वेष्ट्यांवर कारवाई होईल का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात