ठाणे, डोंबिवली आणि कल्याण येथील गुरुपौर्णिमा महोत्सव मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरे !

ठाणे : सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे, कल्याण, डोंबिवली येथे गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले होते. भावपूर्ण वातावरणात संतांच्या वंदनीय उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. ठाणे येथे ४१५, कल्याण येथे १८३, तर डोंबिवली येथे ३८८ जणांनी या सोहळ्याचा लाभ घेतला.

ठाणे येथे सनातनच्या ४९ व्या संत पू. श्रीमती कला प्रभुदेसाई आजी, तसेच डोंबिवली येथे सनातनच्या ५७ व्या संत श्रीमती आनंदी पाटील (वरळी, मुंबई) यांचा सन्मान या वेळी करण्यात आला. ठाणे येथे धर्मकार्यासाठी तत्पर असणार्‍या धर्मप्रेमी महिलांचा सत्कार श्रीमती सुलभा देशपांडे आणि सौ. सुप्रिया कोकाटे यांचा सत्कार श्री. दुर्गेश परुळकर यांच्या हस्ते करण्यात आला.

ठाणे

राष्ट्राची स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना हाच पर्याय – श्री. दुर्गेश परुळकर, लेखक आणि व्याख्याते

श्री. दुर्गेश परुळकर

इस्रायल त्यांच्या मृत झालेल्या हिब्रु भाषेला ५ वर्षात पुन:जिवीत करते; मात्र भारतात ७० वर्षांत दक्षिण भारतातील अनेक जणांना राष्ट्रभाषा हिंदीही अवगत नाही. आपल्या देशात व्यसनजन्य पदार्थ हानीकारक आहेत, असे जाहिरातीद्वारे सांगावे लागते; मात्र त्यांच्या उत्पादनावर बंदी आणली जात नाही. लाल बहादूर शास्त्री यांनी घोषणा केलेल्या ‘जय जवान जय किसान’ या दोन्ही गोष्टी आपण विसरलो आहोत. आज जवान सीमेवर बंदुका घेऊन रात्रंदिवस उभे आहेत, म्हणून आपण सुखाची झोप घेत आहोत; मात्र त्यांच्याविषयी कोणीही येऊन काहीही वक्तव्य करतो आणि त्याला शिक्षाही होत नाही, हे आपले दुर्दैव आहे. राष्ट्राची ही सर्व स्थिती पालण्यासाठी हिंदु राष्ट्र हाच पर्याय आहे.

ठाणे येथील गुरुपौर्णिमेच्या महोत्सवास ठाण्याच्या महापौर सौ. मीनाक्षी शिंदे यांनी कार्यक्रमस्थळी असलेल्या ‘देवघराची मांडणी कशी करावी’, तसेच रणरागिणी शाखेच्या कक्षाला भेट देऊन हे उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगितले. नगरसेवक आणि महापालिका शिवसेना गटनेते श्री. दिलीप बारटक्के आणि शिवसेनेचे श्री. वासुदेव भोईर, भाजपच्या नगरसेविका सौ. आशादेवी शेरबहादूर सिंग, श्री. शेरबहादूर सिंग, जिल्हा भाजप जिल्हा उपाध्यक्ष आधुनिक वैद्य राजेश मढवी, भाजप उपाध्यक्ष श्री. भानुदास भोईर, पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई, ठाण्यातील सुप्रसिद्ध मामलेदार मिसळ उद्योगाचे संचालक श्री. लक्ष्मण नरहसिंह मुर्डेश्‍वर आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

डोंबिवली

धर्माच्या बाजूने लढण्यासाठी सिद्ध व्हा ! – श्री. विक्रम भावे, हिंदु विधीज्ञ परिषद

श्री. विक्रम भावे

आज पोलीस आतंकवाद्यांवर कारवाई करत नाही; पण हिंदुत्वनिष्ठांवर कार्यवाही करण्यात तत्पर असतात. आज अल्पसंख्यांक संघटित होत आहेत. पुढे जाऊन ते आपल्यावर अन्याय आणि अत्याचार करतील, तसेच संघटितपणाच्या बळावर राजकीय पक्षांनाही नमवतील हा धोका ओळखून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटिबद्ध व्हा. सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना जामीन मिळाला; शेवटी सत्याचा विजय झाला. सनातनची बाजू ही सत्याची होती. त्यामुळे जेथे धर्म आहे तेथे विजय आहे; मात्र असे फक्त म्हणत न रहाता आपण धर्माच्या बाजूने लढत रहाणे, ही आपली साधना आहे. त्यासाठी भ्रष्टाचाराच्या, तसेच सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधात लढण्यासाठी सिद्ध व्हा ! स्वतःच्या स्वार्थासाठी सत्ता स्थापन करतांना जसे राजकीय पक्ष एकत्र येतात, तसेच आपणही हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी एकत्र येऊया.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गुरुकुलपद्धत आवश्यक – श्री. आशीर्वाद बोन्द्रे, टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह, डोंबिवली

श्री. आशीर्वाद बोन्द्रे

मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही गुरुकुल शिक्षण पद्धतीचा प्रयोग केला आणि त्यात यशस्वी झालो आहोत. यात मुले १२ तास एकत्र असतात त्यामुळे मुलांमध्ये एकमेकांशी जुळवून घेण्याचा भाग वाढला तसेच मुलांमधील त्यांना आवड असलेल्या कला-गुणांना वाव मिळत आहे; असे सांगत डोंबिवली येथील गुुरुकुलाला एकदा भेट देण्याचे निमंत्रण त्यांनी उपस्थितांना दिले.

श्री संप्रदायाचे श्री. दिलीप घाग, टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ आणि अभ्युदय प्रतिष्ठानचे कार्यवाह श्री. आशीर्वाद बोन्द्रे, भाजप कल्याण जिल्हा सरचिटणीस श्री. नंदू परब आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

कल्याण

देव, देश आणि धर्म यांच्यावरील आघातांविषयी केवळ चर्चा न करता ते रोखण्यासाठी कृतीप्रवण व्हा ! – अधिवक्ता प्रकाश सालसिंगीकर

देव, देश आणि धर्म यांवर होणारे आघात आपण प्रसिद्धी माध्यमांतून पहातो; पण ते रोखण्यासाठी आपण काय करतो तर केवळ चर्चा; मात्र ते रोखण्यासाठी कृतीप्रवण होण्याची वेळ आज आली असून आघात रोखण्यासाठी सिद्ध व्हा, असे परखड मत अधिवक्ता प्रकाश सालसिंगीकर यांनी मांडले, आपण असू त्या ठिकाणावरून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने सेवा, साधना करून देव, देश आणि धर्मासाठी कार्य करू शकतो. हे झाकीर नाईक यांच्या विरोधात त्यांनी दिलेल्या लढ्याबाबत उदाहरण देऊन स्पष्ट केले.

भाजप महिला आघाडीच्या सौ. प्रिया शर्मा या वेळी उपस्थित होत्या.

सनातनच्या कार्याविषयीचा समाजाचा विश्‍वास !

१. सनातनचे कार्य पुष्कळ छान आहे; मात्र वेळ कमी पडतो; पण जेव्हा माझी आवश्यकता वाटेल तेव्हा मला बोलवा मी तुमच्या सोबतच आहे.

– श्री. दिलीप बारटक्के, नगरसेवक आणि ठाणे महापालिका शिवसेना गटनेते

२. सनातनचे कार्य समाजाला प्रेरणा देणारे आहे. या कार्याला माझे नेहमी सहकार्य असेल.

– सौ. आशालता शेरबहादूर सिंग, भाजप नगरसेविका, ठाणे

क्षणचित्रे

१. ठाणे, कल्याण आणि डोंबिवली येथे गुरुपूजनाच्या वेळेस श्री गुरूंचे आवाहन करतांना वरुण देवतेचे आगमन झाले.

२. ठाणे येथे कार्यक्रमस्थळी दैवीकण आढळले त्यामुळे साधकांचा भाव जागृत झाला.

३. श्री. दुर्गेश परुळकर यांच्या हस्ते, तर डोंबिवली येथे श्री. विक्रम भावे यांच्या हस्ते गुरुपौर्णिमा महोत्सव स्मरणिकेचे प्रकाशन झाले.

४. या महोत्सवांमध्ये साध्या वेशातील पोलीस संपूर्ण कार्यक्रम पाहून गेले.

५. महोत्सवांतील स्वसंरक्षण प्रात्यक्षिके उपस्थितांचे विशेष आकर्षण ठरली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related Tags

पोलीसभाजपासनातन संस्थास्वसंरक्षण प्रशिक्षणहिंदु जनजागृती समितीहिंदु राष्ट्रहिंदु विधिज्ञ परिषदहिंदु संघटना आणि पक्षहिंदूंच्या समस्या

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​