महाराष्ट्रातील गुरुपौर्णिमा महोत्सवांना संत आणि मान्यवरांची उपस्थिती, तसेच जिज्ञासूंचा लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

वसई (जिल्हा पालघर)

हिंदूंनी सनातनच्या मार्गदर्शनाखाली एकत्रित यावे ! – श्री. ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल,राष्ट्रीय अध्यक्ष, लष्कर-ए-हिंद

श्री. ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल

हिंदूंची आणि पर्यायाने देशाची आजची दिशाहीन स्थिती पहाता हिंदूंनी सनातनच्या मार्गदर्शनाखाली एकत्रित यावे. सनातनचे वाढते कार्य पाहून काही धर्मद्रोही आणि राष्ट्रविरोधी शक्तींनी सनातनला अपकीर्त करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले; मात्र या सर्वांतून सनातन संस्था सुखरूप राहिली आणि विरोधक तोंडघशी पडले. साधना केल्यावर ईश्‍वर कसे साहाय्य करतो, हे यातून दिसून येते; म्हणून वर्तमान स्थितीत टिकून रहायचे असेल, तर साधनाच करावी लागेल आणि अशी साधना सनातन संस्थेविना कोणीच शिकवू शकणार नाही. आपली भक्ती आणि विचार एवढे दृढ असायला हवेत की, आपण हिंदु राष्ट्राची स्थापना करू शकू.

उपस्थित मान्यवर

विश्‍व हिंदू परिषदेचे वसई सहमंत्री श्री. रविकांत निकम, शिवसेना नगरसेविका सौ. किरण चेंदवणकर, भाजपचे सरचिटणीस श्री. चंद्रशेखर धुरी, वसई-विरार नगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते श्री. विनायक निकम, धर्मप्रेमी श्री. प्रमोद शहा

विशेष सहकार्य

१. श्री. शिरीष जोशी यांनी विश्‍वकर्मा सभागृह विनामूल्य उपलब्ध करून दिले.

२. धर्मप्रेमी श्री. राजा चौधरी यांनी ध्वनीक्षेपक यंत्रणा विनामूल्य उपलब्ध करून दिली.

३. धर्मप्रेमी श्री. प्रमोद शहा यांनी गुरुपौर्णिमेचे आयोजन आणि प्रसार यांमध्ये पुढाकार घेऊन सक्रिय सहभाग घेतला.

नेरूळ (नवी मुंबई)

माहिती अधिकाराचा वापर करून भ्रष्टाचार्‍यांच्या विरोधात लढण्यास सिद्ध व्हा ! – श्री. संजीव पुनाळेकर, राष्ट्रीय सचिव, हिंदु विधीज्ञ परिषद

श्री. संजीव पुनाळेकर

आज प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार मुरला आहे. तो निपटून काढणे, ही आपली समष्टी साधना आहे. त्यासाठी माहितीचा अधिकार हे साधन आहे. त्याचा वापर करून समाजातील दुष्प्रवृत्तींच्या विरोधात आपण सनदशीर लढा देऊ शकतो. माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीच्या आधारे दैनिकांतून लेख लिहिणे, न्यायालयात याचिका प्रविष्ट करणे यांसारख्या कृती करून आपण लढ्यात सहभागी होऊ शकतो. हिंदु विधीज्ञ परिषद त्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करण्यास सिद्ध आहे.

उपस्थित मान्यवर

गावदेवी मंदिराचे माजी अध्यक्ष श्री. नारायण पाटील, घणसोली येथील शिवसेना नगरसेवक श्री. द्वारकानाथ भोईर, ग्रामदेवता मंदिर ट्रस्ट, नेरूळचे विश्‍वस्त श्री. नामदेव कडू, इंडियन एज्युकेशन सोसायटीचे शिक्षक श्री. संजय काळे, प्रभादेवी येथील हितचिंतक आणि विज्ञापनदाते श्री. अतुल वाडकर, शिवसेना विभागप्रमुख श्री. प्रवीण धनावडे, शिवसेना नगरसेवक श्री. काशीनाथ पवार, शिवसेना शहर संघटक श्री. तानाजी जाधव

हितचिंतकांचा सत्कार !

हितचिंतक असलेले आणि इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतील शिक्षक श्री. संजय काळे हे विद्यार्थ्यांकडून ते नियमितपणे नामजप, श्‍लोक आणि मंत्रपठण करून घेतात. यासाठी त्यांचा सत्कार करण्यात आला.

आभार

देवाडीगा भवनचे विश्‍वस्त श्री. रवी देवाडीगा यांनी गुरुपौर्णिमेसाठी विनामूल्य सभागृह उपलब्ध करून दिले.

सोलापूर

आपली संस्कृती आणि धर्म यांचे पालन करण्यासाठी अट्टाहास धरा – अधिवक्त्या (श्रीमती) अपर्णा रामतीर्थकर

हिंदु धर्मामध्ये माझा जन्म झाला, याचा मला अभिमान आहे. सध्या दूरचित्रवाहिनी आणि नाटके यांद्वारे देवतांचे विडंबन केले जाते. आपण हास्याचा विषय समजून त्याकडे पहातो; मात्र सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांविषयी जागृती करते. मुलांना ख्रिस्ती शाळांमध्ये घालून आपण त्यांना ख्रिस्ती बनवत आहोत. आपली संस्कृती आणि धर्म यांचे पालन करण्याचा अट्टाहास धरूया. सोलापूर येथील अनेक मुली लव्ह-जिहादच्या बळी पडल्या आहेत. आज आपला देश, धर्म आणि मुली धोक्यात आहेत. तुमच्यातील श्रीकृष्ण जागा व्हायला हवा. यासाठी ‘आजपासूनच हिंदु राष्ट्र निर्मिती होणार आहे’, या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करा !

क्षणचित्र

स्थानिक वृत्तवाहिनी ‘बी आर् न्यूज’ कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्यासाठी आले होते.

उपस्थित मान्यवर

पंचमुखी हनुमान मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री. सत्यनारायण गुर्रम, गोरक्षक श्री. अभय कुलथे, श्रीराम सेनेचे जिल्हा संयोजक श्री. सिद्धराम नंदर्गी, माजी नगरसेवक श्री. बापू ढगे, मार्केट यार्डमधील व्यापारी श्री. बसवराज इटकळे, श्री. मल्लिनाथ रमणशेट्टी, गीता परिवारचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेश जाधव सर, शिवप्रतिष्ठानचे श्री. रवी गोणे, श्री. रणधीर स्वामी, शिवसेनेचे विवेक इंगळे

सोलापूर येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार !

कु. प्रणव जेवळे याला इयत्ता १२ वीमध्ये ८५ टक्के, कु. जयेश ताटीपामुल याला इयत्ता १२ वीमध्ये ८५.०७ टक्के, तर कु. श्रेया गुब्याड हिला इयत्ता १० वीमध्ये ९६ टक्के गुण मिळाल्याप्रीत्यर्थ त्यांचा सत्कार करण्यात आला.

बार्शी

१. बार्शीचे उपनगराध्यक्ष श्री. कृष्णकांत बारबोले यांचा विशेष सत्कार श्री. विक्रम घोडके यांनी केला.

२. कु. तेजाली कुलकर्णी हिला इयत्ता १२ वी मध्ये ७० टक्के गुण मिळाल्याविषयी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. दीपाली मतकर यांनी तिचा सत्कार केला.

क्षणचित्र

बार्शी येथील रेणुका मंगल कार्यालयाचे मालक श्री. सतीश देशमुख यांनी सांगितले, ‘‘प्रत्येक वेळी साधक सभागृहाची स्वच्छता करतात. या वर्षी आम्ही स्वच्छता करून देतो.’’ त्यांनी सभागृह विनामूल्य उपलब्ध करून दिले.

अकलूज

येथेही गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम पार पडला. स्वसंरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. त्या माध्यमातून उपस्थितांमधील शौर्य जागृत झाले आणि सर्वांना अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळाली.

जळगाव

कायद्याचे प्रशिक्षणसर्वांना देणे आवश्यक ! – अधिवक्ता श्री. सुशील अत्रे

कायद्याचा वापर योग्य पद्धतीने केल्यास स्वसंरक्षण करता येते. यासाठी कायदा समजून घेऊन त्याचे प्रशिक्षण प्रत्येकाला दिले पाहिजे. सामाजिक संकेतस्थळांचाही प्रभावीपणे वापर करून समाजविघातक शक्तींविरुद्ध लढा द्यायला हवा.

अधिवक्ता श्री. सुशील अत्रे यांचा सत्कार सनातन संस्थेचे साधक श्री. नंदकिशोर कोमटी यांनी केला.

क्षणचित्रे

१. ‘सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढ्यात कोण कोण सहभागी होण्यास सिद्ध आहे’, असे वक्त्यांनी विचारल्यावर सभागृहातील सर्वच श्रोत्यांनी हात उंचावून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

२. प्रात्यक्षिके पाहिल्यानंतर ४ प्रशिक्षणवर्गांची मागणी आली.

वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय

‘सनातनचा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम म्हणजे भजन, देवाची पूजा, जप एवढेच काहीतरी असणार’, असे वाटले होते; पण येथे आल्यानंतर मार्गदर्शनाचे विषय आणि स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके पाहून पुष्कळ उत्साह वाटला. माझा भ्रम दूर झाला. ‘सनातन म्हणजे भक्ती अन् शक्ती यांचा संगम आहे’, हे लक्षात आले.

– श्री. आकाश अवकाळे

नंदुरबार

भोणे येथील प्रमुख वक्ते ह.भ.प. रामकृष्ण महाराज यांनी सांगितले, ‘‘गुरु-शिष्याची आदर्श परंपरा सांगतांनाच महिलांनी धर्माचरणाचे संस्कार मुलांवर करणे काळाची आवश्यकता आहे.’’

कोल्हापूर

श्री महालक्ष्मी मंदिरातील वादात प्रश्‍न निर्माण करून समाजात दुफळीमाजवण्याचे षड्यंत्र रचणार्‍यांचा बीमोड करू!- अधिवक्ता समीर पटवर्धन, हिंदु विधीज्ञ परिषद

गेल्या काही दिवसांपासून श्री महालक्ष्मी मंदिरात ‘अंबाबाई कि महालक्ष्मी’ असे वादाचे प्रश्‍न जाणीवपूर्वक निर्माण केले जात आहेत; मात्र असे प्रश्‍न निर्माण करून समाजात दुफळी माजवण्याचे कुटील षड्यंत्र रचणार्‍यांचा पूर्ण शक्तीनिशी बीमोड केला जाईल. श्री महालक्ष्मीदेवी, अंबाबाई ही आपली माता, तसेच लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्यांना धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न कदापी सोडणार नाही !

येथे झालेल्या गुरुपौर्णिमा सोहळ्याला १ सहस्र १०० जिज्ञासू उपस्थित होते. ईश्‍वरपूर (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या पू. (श्रीमती) विजया कुलकर्णी यांची वंदनीय उपस्थिती लाभली.

उपस्थित हिंदुत्वनिष्ठ

हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. प्रमोद उपाख्य नंदू घोरपडे, श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समितीचे सदस्य प्रमोद सावंत, सुधाकर सुतार, शिवसेनेचे करवीर तालुका प्रमुख श्री. राजू यादव, उपशहरप्रमुख श्री. शशिकांत बिडकर, शाहूवाडी तालुक्यातील वारूळ येथील श्री दत्त भक्त मंडळाचे श्री. रामचंद्र कामेरकर

वैशिष्ट्यपूर्ण

१. पू. सचिन महाराज यांनी साधकांना दर्शन दिले. २८ मे येथे काढण्यात आलेल्या भव्य दिंडीतही पू. सचिन महाराज यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.

२. श्री. अमर चौगुले कार्यक्रम पाहून भारावून गेले.

३. स्थानिक वृत्तवाहिन्या ‘बी न्यूज आणि एस् न्यूज’ यांनी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवा’चे चित्रीकरण करून वृत्तसंकलन केले.

४. श्री. जयसिंग घाटगे (वय ७५ वर्षे) केवळ उद्घोषणा ऐकून सोहळ्याला आले होते.

गडहिंग्लज

‘श्री महालक्ष्मी’चे ‘अंबाबाई’ करणार्‍या नास्तिकवाद्यांना धडा शिकवला पाहिजे !- किरण कुलकर्णी, शिवसेना शहरप्रमुख

जे देव-धर्म मानत नाहीत, नास्तिक आहेत, कधी दर्शनासाठी जात नाहीत, ते पुरोगामी आज आम्हा हिंदूंना करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीला ‘महालक्ष्मी’ न म्हणता ‘अंबाबाई’ म्हटले पाहिजे, हे शिकवत आहेत. या नास्तिकवाद्यांना आपण धडा शिकवला पाहिजे !

इचलकरंजी

पुरोगाम्यांना धर्मावर टीका करण्याचाअधिकार कुणी दिला ? – संभाजीभोकरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती निःस्वार्थीपणाने धर्मप्रसाराचे कार्य करतात; मात्र त्यांच्यावर बंदीची मागणी पुरोगाम्यांकडून का केली जाते ? एम्आयएम्सारखे पक्ष समाजात द्वेष पसरवत असतांना देवस्थान समितीमधील भ्रष्टाचारावर पुरोगामी काहीच बोलत नाहीत. पुरोगाम्यांना धर्मावर टीका करण्याचा अधिकार कुणी दिला ? आतंकवादी हे अमरनाथ यात्रा बंद करण्याची धमकी देत असतांना त्यांच्याविषयी पुरोगामी गप्प बसतात.

कार्यक्रमाला महिला आणि आेंकार ग्रुप, हनुमान ग्रुप आणि तुळजाभवानी ग्रुप असा युवा वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता.

जैन समाजातील महिलांचा परात्परगुरु डॉ. आठवले यांच्याविषयी भाव !

जैन समाजातील काही महिला या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्यांना मराठी भाषा समजत नव्हती; मात्र केवळ ‘सनातन संस्थेच्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा कार्यक्रम आहे’, असा भाव ठेवून महिला कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या.

क्षणचित्रे

१. भाजपचे आमदार श्री. सुरेश हाळवणकर यांची पत्नी आणि सुना कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

२. गारगोटी (जिल्हा कोल्हापूर) येथे शिवसेना पक्षाची बैठक होती. त्यामुळे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजी भोकरे यांना कार्यक्रमस्थळी येण्यास विलंब होणार होता; मात्र कार्यक्रमाला जाण्याचा निर्धार करून ते उपस्थित राहिले.

इचलकरंजी आणि गडहिंग्लज येथील सोहळ्याला ६५० जिज्ञासू उपस्थित होते.

सांगली

गुरूंनी सांगिल्याप्रमाणे कृतीकरणे हीच गुरुपौर्णिमा होय !- पू. माधवदास महाराज

गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंची भेट होते. या दिवशी गुरूंप्रती आतून भाव उत्पन्न करणे आणि गुरूंनी सांगिल्याप्रमाणे कृती करणे हीच खरी गुरुपौर्णिमा होय. प.पू. मसूरकर महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे ‘धर्माच्या करिता आम्हास धाडियले’ आहे. त्यामुळे मनुष्यदेह हा हिंदुत्वाच्या कार्यसाठी आहे. त्यामुळे प्रापंचिक कर्तव्य करतांना समाजासाठी, धर्मासाठी काम करणे आवश्यक आहे. आपण सांप्रदायिक साधनेत न अडकता हिंदुत्वासाठी एक व्हायला पाहिजे. आजच्या दिवशी आपण छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, परात्पर गुरु डॉ. आठवले यांना वंदन केले पाहिजे.

उपस्थित मान्यवर

अधिवक्ता श्रीपाद होमकर, माजी आमदार श्री. नितीन शिंदे, हिंदु एकता आंदोलनाचे संस्थापक श्री. नारायणराव कदम, शिवसेनेचे उपशहरप्रमुख श्री. नितीन काळे, पतंजलीचे जिल्हा प्रभारी श्री. श्याम वैद्य, माळी समाजाचे विश्‍वस्त श्री. श्रीकृष्ण माळी, हिंदुत्वनिष्ठ श्री. कुंदन पवार, ह.भ.प. रमाकांत बोंगाळे महाराज, वेदांचार्य लक्ष्मण मोटेशास्त्री

मिरज

हिंदु धर्म-संस्कृती यांसाठी कृती करणे प्रत्येकाचे कर्तव्यच ! – आेंकार शुक्ल, भाजप, सांस्कृतिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष

सध्या जो कोणी हिंदु धर्म-संस्कृती यांच्या विरोधात बोलेल, त्याला महान विचारवंत ठरवण्यात येते. अफझलखानाचे आज उदात्तीकरण करण्यात येत आहे. काश्मीरमध्ये लक्षावधी हिंदू पंडितांना हाकलून देण्यात आले, त्यावर कोणी बोलत नाही, केरळ-कर्नाटक राज्यात हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या होतात, यावर कोणी बोलत नाही. त्यामुळे हिंदुत्वावर सर्व बाजूंनी आघात होत असतांना हिंदु धर्म-संस्कृती यांसाठी कृती करणे, हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्यच आहे.

‘हिंदु राष्ट्र स्थापनेचे महान ध्येय ठेवून परात्पर गुरु डॉ. आठवले प्रयत्नरत आहेत. त्यामुळे या कार्यात प्रत्येकाने योगदान देणे आवश्यक आहे. एक ना एक दिवस हिंदु राष्ट्र येणारच आहे, याची निश्‍चिती प्रत्येकाने बाळगली पाहिजे’, असेही आेंकार शुक्ल म्हणाले.

उपस्थित हिंदुत्वनिष्ठ आणि मान्यवर

भाजपचे प्रदेश चिटणीस श्री. मकरंद देशपांडे, माजी नगरसेवक श्री. पांडुरंग कोरे, भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष श्री. अजिंक्य हंबर, भाजपचे श्री. जयगोंड कोरे, शिवसेनेचे उद्योग सहकारी आघाडीचे श्री. तात्या कराडे, शिवसेनेचे मिरज शहरप्रमुख श्री. चंद्रकांत मैगुरे, रेल्वे प्रवासी सेनेचे श्री. संदीप शिंदे, शिवसेनेचे सर्वश्री आनंद राजपूत, गिरीष जाधव, अमोल भोसले, युवा सेनेचे श्री. आेंकार जोशी, हिंदुत्वनिष्ठ श्री. सतीश तोडकर, अधिवक्ते सी.जी. कुलकर्णी, श्री. पाटील, शिवा अखिल भारतीय वीरशैव संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष श्री. मिलिंद हारगे, गोरक्षा समितीचे श्री. विनायक माईणकर

सोहळ्यासाठी सातारा येथील पू. विजय महाराज यांची वंदनीय उपस्थित होती.

जयसिंगपूर येथील १२ इयत्तेत ८६ टक्के गुण मिळवलेला कु. श्रीनिवास येळेगावकर आणि १२ वीच्या परीक्षेत ८५ टक्के गुण मिळवणार्‍या संभाजी पाटील यांचा सत्कार सनातनचे पू. जयराम जोशी (आजोबा) यांच्या हस्ते करण्यात आला.

विशेष

१. कागले मंडपाचे श्री. संतोष कागले हे वेळोवेळी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या कार्यासाठी करत असलेल्या सहकार्याविषयी त्यांचा सत्कार करण्यात आला.

२. शिवसेनेचे श्री. संदीप शिंदे यांनी सोहळा झाल्यावर सभागृहात काही काळ सेवा केली.

तासगाव

विशेष उपस्थिती

नगराध्यक्ष डॉ. विजय सावंत, तसेच विटा येथील काँग्रेसचे माजी आमदार श्री. सदाशिवराव पाटील

उपस्थित मान्यवर

विटा येथील उपनगराध्यक्ष श्री. किरण तारळेकर, विटा येथील प्रतिष्ठित व्यापारी श्री. गंगाधर (शेठ) लकडे, श्री गणेश चॅरिटेबल ट्रस्टचे श्री. दिलीप जोगळेकर, ब्राह्मण सभेचे श्री. जगदीश कालगावकर, विटा येथील महाराष्ट्र राज्य फार्मसी काऊन्सिलचे अध्यक्ष श्री. विजय पाटील, वासुंबे येथील सरपंच सौ. वनिता पाटील, मणेराजुरी येथील सरपंच श्री. लालासाहेब पवार, विटा येथील सांगली जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे सचिव श्री. भरत सावंत, येळावी येथील अधिवक्ता श्री. संतोष पाटील, नागाव येथील तंटामुक्ती अध्यक्ष श्री. ज्ञानेश्‍वर पाटील, जुळेवाडी येथील तंटामुक्ती अध्यक्ष श्री. रवींद्र खोत उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related Tags

मंदिरे वाचवामहालक्ष्मी मंदिरशिवसेनासनातन संस्थास्वसंरक्षण प्रशिक्षणहिंदु जनजागृती समितीहिंदु धर्महिंदु धर्माविषयी अज्ञानहिंदु राष्ट्रहिंदु संघटना आणि पक्षहिंदू महासभाहिंदूंचे धर्मांतरणहिंदूंच्या समस्या

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​