मुंबई : इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्या एका तरुणाला ठाण्यातील मुंब्रा येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक (एटीएस) यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. ताब्यात घेण्यात आलेला तरुण इसिसच्या संपर्कात होता. त्याच्यावर पाळत ठेवून त्याला ताब्यात घेण्यात आले. याबाबत अधिक तपशील स्पष्ट झालेला नाही. दरम्यान, पुढील तपासासाठी त्याला एनआयएच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
यापूर्वी कल्याणमधून इसिसच्या संपर्कात आलेले तीन तरुण सीरियाला गेले होते. त्यानंतर त्यापैकी दोघांना पुन्हा भारतात परतल्यावर ताब्यात घेण्यात आले होते.
संदर्भ : सकाळ