देशभरातील धर्मांधांची वाढती आक्रमणे शासनाच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करतात ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
- ९ जण घायाळ बसगाड्या, दुचाकी यांना आग लावली
- अनेक दुकानांची तोडफोड शस्त्रास्त्रांनी आक्रमण

धार (मध्यप्रदेश) : स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांनी मनावर येथे काढलेल्या शौर्य यात्रेवर धर्मांधांकडून आक्रमण करण्यात आले. या वेळी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली, दोन बसगाड्या आणि दुचाकी यांना आग लावण्यात आली. अनेक दुकांनांची तोडफोड करण्यात आली, तसेच शस्त्रास्त्रांद्वारेही आक्रमण करण्यात आले. दगडफेकीमध्ये दोन पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी मिळून ९ जण घायाळ झाले. शहरात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. जमावाला पांगवण्यासाठी जवळच्या जिल्ह्यांतून पोलीस दल मागवण्यात आले.
१. जमावाकडून रात्री उशिरा एका टायरच्या शोरूमला आग लावण्यात आली.
२. मनावरमध्ये एकच अग्नीशमक गाडी असल्यामुळे आग विझवण्यासाठी धरमपुरी येथून दुसरी गाडी बोलावण्यात आली.
३. एका शाळेची मुले शाळेतच अडकून पडली. रात्री सव्वासात नंतर त्या सर्वांना पोलिसांनी सोडवले.
४. स्थानिक पोलीस अधीक्षक सुट्टीवर असल्यामुळे बडवाणी येथील पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बहुगुणा आणि खरगोन येथील पोलीस अधीक्षक अमित सिंह यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात