वाराणसीतील शासकीय परिसरात उभ्या रहात असलेल्या अनधिकृत मशिदीवर कारवाई करा ! – अधिवक्ता कमलेश चंद्र त्रिपाठी

शासकीय परिसरात उभ्या रहात असलेल्या अनधिकृत मशिदीवर कारवाई करण्याची मागणी का करावी लागते ? शासन स्वतःहून कारवाई का करत नाही ? या अनधिकृत मशिदीत आतंकवादी येऊन राहिल्यास आणि उद्या वाराणसीचे पठाणकोट झाल्यास त्याचे दायित्व प्रशासन घेणार का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

  • अधिवक्ता कमलेश चंद्र त्रिपाठी यांची प्रशासन आणि पोलीस यांच्याकडे मागणी
  • प्रशासनाचे दुर्लक्ष, पोलिसांचाही कारवाई करण्यास नकार !
अधिवक्ता कमलेश चंद्र त्रिपाठी

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसीमध्ये विश्रामगृहाचा परिसर सुरक्षेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील समजला जातो. या विश्रामगृहाच्या पूर्वेकडील दाराजवळ आणि परिसराच्या आतच अनधिकृतपणे आणि शासकीय कर्मचार्‍यांना धाकदपटशा दाखवून मशिदीचे बांधकाम करण्यात येत आहे. या बरोबरच या परिसरात अवैधपणे वाहनतळही बनवण्यात आले आहे. एवढेच नव्हे, तर त्यावर ध्वनीक्षेपक बसवून अजानही दिली जात आहे; परंतु या सर्व बाबींकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. या संदर्भात येथील धर्माभिमानी अधिवक्ता कमलेश चंद्र त्रिपाठी यांनी जिल्हाधिकार्‍यांना कारवाईसाठी निवेदन दिले; परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

अधिवक्ता त्रिपाठी यांनी वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांनाही पत्र लिहून याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. या पत्रात त्यांनी या मशिदीच्या परिसरात अनेक संशयास्पद युवक बिनधास्तपणे येत-जात असतात. त्यामुळे विश्रामगृहाच्या पूर्व दिशेच्या दारातून नमाजासाठी जाणार्‍या लोेकांची सुरक्षा उपकरणाद्वारे पडताळणी करण्यात यावी. त्यानंतरच त्यांना परिसरात प्रवेश करण्याची अनुमती द्यावी, अशीही मागणी केली. हे पत्र प्राप्त झाल्यावर पोलीस अधीक्षकांनी विभागीय अधिकार्‍यांना कारवाई करण्याचे आदेश दिले; मात्र या अधिकार्‍यांनी मशिदीच्या जवळ शोध-पडताळणीसाठी सुरक्षा कर्मचार्‍याची नियुक्ती केल्यास धार्मिक तणाव वाढण्याची शंका उपस्थित करून हे अनुचित ठरवले, तसेच सुरक्षा कारवाईला मुसलमानविरोधी ठरवून कारवाई करण्यास नकार दिला. (वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांचा आदेश धुडकावणारे पोलीस सामान्य जनतेची गार्‍हाणी कशा प्रकारे सोडवत असतील, हे वेगळे सांगायला नको. हे पोलीस अनधिकृत मशिदीमध्ये येणार्‍या संशयास्पद लोकांची पडताळणी करण्यास नकार देतात; मात्र हिंदूंच्या सनदशीर आंदोलन करणार्‍या आंदोलकांवर मात्र लाठीमार करतात, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​