अधिक वार्ता

‘लव्ह जिहाद’च्या संदर्भात कठोर कायदा होणे आवश्यक ! – महामंडलेश्‍वर श्री श्री १००८ श्री महंत भैय्याजी महाराज, अखिल भारतीय श्री पंच निर्मोही अनी आखाडा, हरियाणा

‘लव्ह जिहाद’च्या संदर्भात वर्तमानकाळात कठोर कायदा होणे आवश्यक आहे. पैशांचे अमीष दाखवून धर्मांतर केले जात आहे. सर्वांच्या मनात स्वाभिमान निर्माण केल्यास निश्‍चितपणे धर्मांतर रोखले जाऊ शकते, असे प्रतिपादन फरीदाबादमधील (हरियाणा) वल्लभगड येथील अखिल भारतीय श्री पंच निर्मोही अनी आखाड्याचे महामंडलेश्‍वर श्री श्री १००८ श्री महंत भैय्याजी महाराज यांनी केले. Read more »

बेंगळुरूमध्ये कोरोनाबाधितांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी नातेवाइकांकडून अवैधरित्या घेतले जात आहेत ३५ ते ४० सहस्र रुपये !

सोमनहळ्ळी येथील मृताचे नातेवाईक म्हणाले की, अंत्यसंस्काराच्या नावावर लूट चालली आहे. रुग्णवाहिकेसाठी १३ सहस्र रुपये, पूजेच्या नावाखाली १० सहस्र रुपये, विद्युत दाहिनीत दहन करण्यासाठी ६ सहस्र ५०० रुपये, नातेवाइकाला पी.पी.ई. किट देण्यासाठी १ सहस्र रुपये आणि कर्मचार्‍याला ५ सहस्र रुपये असे पॅकेज ठरवण्यात आले आहे. Read more »

माझ्या मतदारसंघातील ४७ तरुणी ‘लव्ह जिहाद’ला बळी पडल्या आहेत ! – केरळमधील आमदार पी.सी. जॉर्ज

 माझ्या मतदारसंघातील ४७ तरुणी लव्ह जिहादला बळी पडल्या आहेत. यात १२ हिंदु आणि ३५ ख्रिस्ती आहेत. त्यांचे इस्लाममध्ये धर्मांतर करण्यात आले कि त्यांना कुठे नेण्यात आले ? हे मात्र मला ठाऊक नाही. मी लव्ह जिहादसाठी धर्माला दोष देत नाही; मात्र देशात धर्मांध आहेत, असे विधान केरळ जनपक्षम् (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे आमदार पी.सी. जॉर्ज यांनी केले आहे. Read more »

कुंभमेळा प्रतिकात्मक ठेवावा !

 हरिद्वार येथील महाकुंभमेळ्यामध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग पहाता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभमेळा प्रतिकात्मक ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी याविषयी महामंडलेश्‍वर स्वामी अवधेशानंद गिरि यांच्याशी दूरभाषवर चर्चा केली. Read more »

ओझर्डे (जिल्हा सातारा) येथील सैनिक सिक्कीम येथे कर्तव्यावर हुतात्मा !

वाई तालुक्यातील ओझर्डे गावाचे सैनिक सोमनाथ अरविंद तांगडे हे सिक्कीम येथील कॉलिंगपाँग येथील बर्फाच्या टेकडीवर कर्तव्य बजावत होते. बर्फाच्छादीत प्रदेशात आलेल्या वादळी वार्‍याने आणि पावसाने गंभीर घायाळ झालेले तांगडे हे रुग्णालयात उपचार चालू असतांना हुतात्मा झाले. Read more »

वैदिक हिंदु धर्माची कालगणना सर्वश्रेष्ठ आहे ! – सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

गुढीपाडवा, चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदेला नववर्षारंभ असण्याला नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व असून हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. याचा उल्लेख प्राचीन वेदांमधे आहे. संतांचे साहित्य, अभंग, लेख यांमध्येही गुढीचा उल्लेख केलेला आढळतो. आपल्या वैदिक हिंदु धर्माची कालगणना सर्वश्रेष्ठ आहे. हिंदु धर्माची उत्पत्ती होऊन अनेक वर्षे झाली असून हिंदु संस्कृतीला कोट्यवधी वर्षांचा प्राचीन इतिहास आहे, हे लक्षात घेऊन हिंदु संस्कृतीनुसार गुढीपाडवा सण साजरा करून धर्माचरण करा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. सुमित सागवेकर यांनी केले. Read more »

आतंकवाद रोखण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करा ! – केरळचे आमदार पी.सी. जॉर्ज

भारताला वर्ष २०३० पर्यंत इस्लामी राष्ट्र बनवण्यासाठी आतंकवाद्यांसमवेत काम करत आहेत. हा प्रयत्न रोखण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र घोषित केले पाहिजे, अशी मागणी केरळ जनपक्षम् (धर्मनिरपेक्ष) या पक्षाचे आमदार पी.सी. जॉर्ज यांनी येथील थोडुपुझा येथे आयोजित एका बैठकीत केले. Read more »

गुढी हा आमचा धर्म, धर्माचरण आणि धर्माभिमान आहे ! – सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी ४० दिवस पापी औरंगजेबाचे अत्याचार सहन केले; पण त्यांनी हिंदु धर्म सोडला नाही म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचा बलीदानदिन नव्हे, तर त्यांचा शौर्यदिन आम्ही मानतो; पण आज त्या महापुरुषाचे नाव घेऊन धर्मद्रोही लोक हिंदु धर्माविरोधात प्रचार करतात, हे अत्यंत लज्जास्पद आहे. Read more »

५ राज्यांतील निवडणुकांमध्ये प्रचंड प्रमाणात कोरोना रुग्णांची वाढ !

गेल्या १५ दिवसांचा विचार केल्यास विधानसभा निवडणुका असलेल्या ५ राज्यांमध्ये कोरोनाचा विस्फोट झाल्याचे पहायला मिळत आहे. १ ते १४ एप्रिल या कालावधीत आसाममध्ये ५३२ टक्के, बंगालमध्ये ४२० टक्के, तमिळनाडूमध्ये १५९ टक्के, पुद्दुचेरीत १६५ टक्के, तर केरळमध्ये १०३ टक्क्यांनी कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याची माहिती समोर आली आहे. Read more »

निरंजनी आखाड्याकडून हरिद्वारमधील कुंभमेळ्याच्या समाप्तीची घोषणा

हरिद्वार कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचे कारण सांगत येथील कुंभमेळ्यात सहभागी झालेले निरंजनी आखाड्याचे सचिव महंत रवींद्र पुरी यांनी, तसेच आनंद आखाडा यांनी कुंभमेळा समाप्तीची घोषणा केली आहे. Read more »

1 2 3 1,219