कुठे आता कार्य उरले नसल्याने पृथ्वीवरील जीवनाचा कंटाळा आल्यासारखे वाटणारे प.पू. डॉक्टर, तर कुठे युगानुयुगे कार्य करणारा ईश्‍वर, सर्व देवता आणि अनेक ऋषी !

हिंदु राष्ट्राची, म्हणजे रामराज्याची स्थापना होणार, याची खात्री अनेक संत आणि नाडी भविष्य सांगणारे ऋषी यांनी मला दिली आहे. त्यामुळे आता करण्यासारखे काही कार्य उरले नसल्याने मला पृथ्वीवरील जीवनाचा कंटाळा आल्यासारखे झाले. तेव्हा विश्‍वाचा निर्माता ईश्‍वर, सर्व देवता आणि अनेक ऋषी यांनी सत्त्वप्रधान राज्याची स्थापना करण्यासाठी युगानुयुगे कार्य केले आहे, … Read more

वाचकसंख्या वाढावी यासाठी सनातन प्रभातमध्ये लेख आणि सदरे छापत नाहीत,…

वाचकसंख्या वाढावी यासाठी सनातन प्रभातमध्ये लेख आणि सदरे छापत नाहीत, तर वाचकांची व्यष्टी आणि समष्टी साधना चांगली व्हावी, तसेच राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करण्यास त्यांना दिशा मिळावी, यांसाठी असतात.

संत नेहमी आनंदी असतात

‘आपल्या मुलाचे पुढे कसे होणार ?’, ही काळजी त्याच्या आई-वडिलांना असते. याउलट ‘राष्ट्रातील सर्वजण आपलीच मुले आहेत’, या व्यापक भावामुळे संत नेहमी आनंदी असतात.’

पाश्‍चात्त्य वैद्यकीय प्रणाली कधी परिपूर्ण उपाय करू शकेल का ?

व्यक्तीची प्रकृती वात, पित्त कि कफ प्रधान आहे, तिचे प्रारब्ध काय आहे, हे ज्ञात नसणारी पाश्‍चात्त्य वैद्यकीय प्रणाली कधी परिपूर्ण उपाय करू शकेल का ?

सर्वसाधारण व्यक्ती, संत आणि पंचमहाभूते

शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात, हे सर्वसाधारण व्यक्तीच्या संदर्भात खरे असते; कारण त्यांचे कार्य पंचमहाभूतांच्या स्तरावरचे असते. याउलट संतांचे कार्य शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांच्या स्तरावरचे असल्यामुळे त्याचा संबंध शब्द, स्पर्श, रूप… यांच्याशी नसतो.

विज्ञान केवळ स्थूल पंचज्ञानेंद्रियांच्या संदर्भात संशोधन करते, तर अध्यात्म स्थूल…

विज्ञान केवळ स्थूल पंचज्ञानेंद्रियांच्या संदर्भात संशोधन करते, तर अध्यात्म स्थूल आणि सूक्ष्मच नव्हे, तर सूक्ष्मतर, सूक्ष्मतमाचाही विचार करते !

विज्ञानाने अध्यात्माला प्रमाणपत्र द्यायची आवश्यकता नाही !

विज्ञानवाद्यांनो, हे लक्षात घ्या की, विज्ञानाने अध्यात्माला प्रमाणपत्र द्यायची आवश्यकता नाही, उलट अध्यात्माने विज्ञानाला प्रमाणपत्र दिले पाहिजे; कारण हल्ली समजले जाणारे विज्ञान शेवटी मायेतीलच आहे !