भगवंताचा धांवा

किंकर्तव्यमूढ ब्रह्मदेवाचा भगवंताचा धांवा कृपा करी गा अच्युता । धांवे पावे गा भगवंता । या एकार्णवाआंतोता । होई रक्षिता मज स्वामी ॥६९॥ मी अतिशयें तुझें दीन । मजवरी कृपा करी संपूर्ण । निजभावें अनन्यशरण । मनी लोटांगण घालितसे पैं ॥७०॥ ऐसी ब्रह्मयाची ती चिंता । तत्काळ कळली भगवंता । तो अंतर्यामी जाणता । करता करविता … Read more

सृष्टिरचना

स्वरुपाची यथार्थ ओळख न झाल्यामुळें ब्रह्मदेव सृष्टिरचना करण्यास भांबावला एवं नाभिकमळीं कमलासन । बैसला केवळ अज्ञान । तंव हदयी झाली आठवण । मी येथें कोण कैचा पां ॥६१॥ मज कैचें हें कमलासन । येथें याचें मूळ तें कवण । तें पाहावया आपण । जळीं निमग्न स्वयें जाहला ॥६२॥ सहस्त्रवरुषें बुडी देतां । कमळमूळ नयेचि हाता … Read more

भगवत्प्राप्ति

कामनारहित तपानें भगवत्प्राप्ति कामनारहित निष्पाप । श्रद्धापूर्वक सद्रूप । निष्कपट करितां तप । भगवत्स्वरुप तें भेटे ॥५५॥ नकरितां भगवदभजन । ब्रह्मा होऊं न शके पावन । यालागीं तपादि साधन । स्वयें निजभजन हरी प्रेरी ॥५६॥ या ब्रह्मयाची निजस्थिती । कल्पाचिये आदिप्राप्ती । कैशी होती परीक्षिती । ते मी तुजप्रती सांगेन पां ॥५७॥ इंद्रादिदेवां पूज्य तत्त्वतां … Read more

ज्ञानप्राप्ति

भगवदभजनाशिवाय ब्रह्मदेवालासुद्धां ज्ञानप्राप्ति नाहीं न करितां भगवदभक्ती । ब्रह्मयासी नव्हे ज्ञानप्राप्ती । तेथें इतरांची कोण गती । अभजनी प्राप्ती पावावया पैं ॥५२॥ जीवाचे निरसावया अज्ञान । मुख्यत्वें असे भगवदभजन । स्वयें करिताहे चतुरानन । तेंचि निरुपण शुक सांगे ॥५३॥ केवळ चैतन्य विग्रहो । सत्यसंकल्प भगवद्देहो । त्याचे दर्शनार्थ पहाहो । तपादि उपावो हरी प्रेरी ॥५४॥

ब्रह्मदेवाची कथा

श्रीशुक परिक्षितीला ब्रह्मदेवाची कथा सांगतात आदिकल्पाचिये आदीं । एकार्णवजळामघी । ब्रह्मा झाला जडमूढबुद्धी । सृष्टिसर्जनविधि स्फुरेना ॥३२॥ यापरी केवळ अज्ञान । नाभिकमळीं कमळासन । विसरलां आपणा आपण । मी हें कोण स्फुरेना त्या ॥३३॥ यालागीं श्रीनारायण । द्यावया निजात्म शुद्ध ज्ञान । आपुली निजमूर्ती चिदधन । तिचे दर्शन देऊं पाहे ॥३४॥ श्रीनारायणाची दिव्य मूर्ती । … Read more

कथासूत्र

श्रोत्यांना विनंती व कथासूत्र आतां अवधारा ग्रंथकथन । कल्पादि हें पुरातन । हरिब्रह्मयांचें जुनाट ज्ञान । तेथें अवधान श्रोतीं द्यावें ॥२५॥ जेणें संतोषती ज्ञानसंपन्न । सुखें सुखरुप होती मुमुक्षुजन । तें हें हरिब्रह्मयांचें ज्ञान । तेथें अवधान श्रोतीं द्यावें ॥२६॥ जो जडमूढ होता तटस्थ । तो चौश्लोकीं जाण नेमस्त । ब्रह्मा केला ज्ञानसमर्थ । तो … Read more

आत्मनिवेदन

नाथांचें अनहंकारी आत्मनिवेदन नुरवूनि मीतूंपणाची वार्ता । वदविताहे ग्रंथकथा । तेथें मी कविकर्ता । हे कोणें अहंता धरावी ॥२१॥ मज नाहीं ग्रंथ अहंता । ह्नणोनि श्रोत्यांचें विनविता । ते विनवणीच तत्त्वतां । अंगीं अहंता आणूं पाहे ॥२२॥ तंव माझें जें कां मीपण । तें सदगुरु झाला आपण । तरी करितांही विनवण । माझें मीपण मज … Read more

गुरुदास्याचें महिमान

ऋद्धिसिद्धिही अंगें आपण । त्याचे घरीचे वाहती जीवन । एवढें गुरुदास्याचें महिमान । सभाग्यजन पावती ॥१५॥ गुरुसेवेहोनी वरुता । उपाय नाहीं परमार्था । हे सत्यसत्य माझी वार्ता । वेदशस्त्रार्था संमत ॥१६॥ ते गुरुसेवेची अभिनव खूण । स्वामीसेवक न होती भिन्न । नुरवूनियां मीतूंपण । सेवका जनार्दन संतुष्टे ॥१७॥ हें वर्म जंव नये हातां । तंव … Read more

गुरुमहिमा

त्याचे चरणींची माती । अवचटें लागल्या स्वचित्तीं । जन्ममरणा होय शांती । चारी मुक्ती वोळगण्या ॥१०॥ तो जिकडे पाहात जाय । ते दिशा सुखरुप होय । त्याचे जेथें लागती पाय । तेथें धांवे लवलाहें परमानंदू ॥११॥ यालागी त्याचे वंदितां चरण । जीवासी वोडवे शिवपण । चरणस्पर्शे स्वानंद पूर्ण । अगाध महिमान गुरुचरणीं ॥१२॥ त्याची सदभावें … Read more

सदगुरुवंदन

॥ श्रीगणेशाय नमः ॥ । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः । श्रीकृष्णाय नमः । आदीं वंदू गणनायका । नरकुंजरा अलोलिका । नरगजस्वरुपें तूं एका । नमन श्रीविनायका सदगुरु ॥१॥ तुज सदभावें करितां नमन । विघ्नचि होय निर्विघ्न । यापरी तुझी कृपा पूर्ण । चैतन्यघन गणराजा ॥२॥ सालंकृतशुक्लांबरी । हंसारुढी परमेश्वरी । सदगुरुरुपें वागेश्वरी । म्यां … Read more