सहभागी व्हा !

संकेतस्थळाचा उपयोग करून आदर्श भावी पिढी घडवण्यात योगदान द्या !
१. मुलांनो, हे करा !

अ. या संकेतस्थळाविषयी आपल्या मित्रांना माहितीसांगा.

आ.संकेतस्थळावरील माहिती वाचूनतुम्ही केलेली कृती व त्यामुळे तुम्हाला झालेला लाभ आम्हाला[email protected]या संगणकीय पत्त्यावर (इमेल id) पाठवा.

२. पालकांनो, हे करा !

अ. संकेतस्थळावरील लेखवाचून आपल्या मुलांना त्याविषयी माहिती द्या !

आ. आपल्या मुलांना हे संकेतस्थळ दाखवून त्यात सांगितल्याप्रमाणे कृती करवून घ्या !

इ. आपल्या कार्यालयात, मित्र – मंडळी, सहकारी, आप्तेष्ट अन्हितचिंतक यांना या संकेतस्थळाबद्दल माहिती द्या !

३. शिक्षकांनो / मुख्याध्यापकांनो, हे करा !

अ. मूल्यशिक्षणाच्या वा ‘ऑफ’ तासाला संकेतस्थळावरील विषय मुलांना शिकवा !

आ. संकेतस्थळातील एकेक विषय शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना प्रतिदिन सामुदायिक प्रार्थनेनंतर ध्वनीक्षेपकाच्या (स्पीकर) साहाय्याने १० मिनिटे सांगा !

इ. संकेतस्थळावरील विविध विषयांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करा !

४. संस्कारवर्ग-सेवकांनो, हे करा !

अ.संकेतस्थळातीलविषय बालसंस्कार आणि विद्यार्थी संस्कारवर्गांत शिकवा !

आ. संस्कारवर्गातील मुलांकडूनसंकेतस्थळावरील संत, राष्ट्रपुरुष अन्क्रांतीकारक यांचेविषय पाठ करवून घ्या आणि ते शाळा, शिकवणीवर्ग आदी ठिकाणी मांडण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या !

इ. मुलांचे संगणक-प्रशिक्षणवर्ग, शिकवणीवर्ग, अनाथाश्रम, वसतीगृहे, उन्हाळी आणि दिवाळी सुटीतील शिबिरे आदी ठिकाणच्या प्रमुख कार्यकर्त्यांना भेटून त्यांनासंकेतस्थळातीलविषय मुलांना आठवड्यातून एक घंटा (तास) किंवा त्यांच्या सोयीनुसारसांगण्याच्या दृष्टीने उद्युक्त करा !

५. इतर(सर्वांसाठी)

अ. आपल्या संकेतस्थळ / ब्लॉग वर ‘बालसंस्कार’ संकेतस्थळाची मार्गिका (लिंक) द्या.

आ.संकेतस्थळाचा पत्ता लघुसंदेश ( एस.एम.एस ) द्वारे इतरांना पाठवा.

इ. बालसंस्कार संकेतस्थळावरील नवीन प्रसिद्ध झालेले लेख तुमच्या इमेल पत्त्यावर त्वरित मिळण्यासाठी आमच्या ' बालसंस्कारगटात’ सहभागी व्हा !

ई.संकेतस्थळावरील लेखांचा प्रसार संगणकीय पत्रे, तसेच ‘फेसबूक’, ‘ट्विटर’, ‘गुगल प्लस’ यांसारख्या सामाजिकसंकेतस्थळाच्या माध्यमांतूनआणि ‘ऑनलाईन ग्रुप्स’ द्वारे करा !