दिवाळीत किल्ला का बांधतात ?
किल्ला बांधणे म्हणजे काय ?

किल्ला बांधणे म्हणजे स्वतःच्या मन आणि बुद्धी यांवर ईश्‍वराच्या शक्‍तीचे तेज निर्माण होणे. म्हणूनच किल्ला बांधणे या माध्यमातून आपण ईश्वराचे तेज प्राप्त करू शकतो.

लहान मुलेच किल्ला का बांधतात ?

लहान मुलांमध्ये निर्मळता असते. लहान मुले ही 'ईश्‍वराचे रूप असतात', असे म्हटले जाते; कारण लहान मुलांच्या मनावर जास्त संस्कार झालेले नसतात. लहान मुलांमध्ये निर्मळता असते. ११ वर्षापर्यंतची मुले ही निरागस असतात. त्यानंतर मात्र मूल बुद्धीने एखादी कृती करतो. मुलांमध्ये ईश्वराकडून आलेली उर्जा ग्रहण करण्याची क्षमता असते.

किल्ला घराच्या बाहेरच का बनवतात ?

घर हे समृद्धी-दर्शकतेचे प्रतीक असते. घरासमोर किल्ल्याची निर्मिती केल्यामुळे घराचे रक्षण करण्यासाठी, म्हणजेच घरात असलेल्या धनसमृद्धीला टिकवून ठेवण्यासाठी छत्रपतीशिवाजी महाराजांसारख्या क्षात्रतेजाचे प्रतिनिधीत्व करणार्‍या, किल्ल्याचे नेतृत्व असलेल्या धर्माचरणी राजाशी अभेदता निर्माण करते.