पू. (सौ.) योया वाले यांनी रेखाटलेली श्रीकृष्णाच्या अस्तित्वाची अनुभूती देणारी भावचित्रे

पॅरिस, फ्रान्स येथील मॉडेल सौ. योया सिरियाक वाले यांना हिंंदु धर्म, अध्यात्म आणि साधना यांचे महत्त्व पटल्यावर त्यांनी हिंदु धर्मानुसार साधनेला आरंभ केला. स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.) या आध्यात्मिक संघटनेच्या माध्यमातून साधना करत ख्रिस्ताब्द २०१३ मध्ये त्यांनी संतपद गाठले.

भगवान श्रीकृष्णाप्रती असलेल्या अत्युच्च भावामुळे पू. (सौ.) योया वाले यांना विविध भावचित्रे स्फुरली आहेत. या भावचित्रांच्या चित्रकर्त्या पू. (सौ.) योया वाले या स्वतः संत असल्याने या चित्रांमध्ये भाव आणि चैतन्य अधिक प्रमाणात आहे. पू. (सौ.) योया यांनी श्रीकृष्णाप्रती असलेले विविध भाव एका बालसाधिकेच्या माध्यमातून या भावचित्रांतून रेखाटले आहे.

१. ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या पू. (सौ.) योया वाले यांनी जन्माष्टमीच्या दिवशी
काढलेले श्रीकृष्णाकडे, म्हणजेच मोक्षाकडे जाण्याच्या मार्गाचे भावचित्र

पू. (सौ.) योया वाले

पू. (सौ.) योया वाले

मागील वर्षी २८.८.२०१३ या दिवशी श्रीकृष्ण जयंती (श्रीकृष्ण जन्माष्टमी) असल्यामुळे मी श्रीकृष्णाच्या आठवणीत रममाण झालेे होते. ‘तो कसा दिसत असेल ?कोणत्या लीला करत असेल?’या विचारांत मी हरवून गेले होते. श्रीकृष्णाच्या विचारात दंग असतांना मला गोपींप्रमाणे वेशभूषा करण्याची इच्छा झाली आणि मी तशी साडीही परिधान केली. त्यामुळे मला उत्साही आणि आनंदी वाटत होते. या गोपीभावात असतांनाच मला सूक्ष्मातून एक दृश्य दिसले.

पाळण्याची दोरी ओढणार्‍या गोप-गोपींकडेप्रीतीयुक्त दृष्टीने पहातांना बाळकृष्ण

१. त्यात मला एक छोटासा पाळणा दिसला. पाळण्यात श्रीकृष्णाचे चित्र असून त्याच्या बाजूला सूक्ष्मरूपात श्रीकृष्ण (बाळकृष्ण) बसलेला आहे. पाळण्याला एक लांबलचक दोरी बांधली आहे.

२. श्रीकृष्णाला झोपवण्यासाठी गोप-गोपी ती दोरी ओढून पाळण्याला झोके देत आहेत.

३. त्या वेळी दोरी ओढणार्‍या गोप-गोपींकडे श्रीकृष्ण प्रीतीयुक्त दृष्टीने पहात स्मित करत आहे.

४. दोरी ओढणारे गोप-गोपी म्हणजे साधकच आहेत; कारण साधकांमध्ये गोपीभाव असल्यामुळे ते गोप-गोपींप्रमाणे वाटत आहेत.

५. हा पाळणा हे मोक्षाचे प्रतीक असून पाळण्याला बांधलेली दोरी म्हणजे मोक्षाकडे जाणारा मार्ग आहे.

६. साधकांनी दोरी ओढणे म्हणजे मोक्षप्राप्ती होईपर्यंत स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांसह अष्टांग साधना करण्याचा प्रयत्न करणे आणि या प्रयत्नांना भावजागृतीच्या अथक प्रयत्नांची जोड देणे होय.

– (पू.) सौ. योया वाले, युरोप, ‘एस्.एस्.आर्.एफ्.'(२८.८.२०१३)

२. स्वतः श्रीकृष्णाला आत्मनिवेदन करणारी
बालसाधिका असल्याचा विचार येऊन त्या बालसाधिकेचे चित्रकाढणे

‘१५.८.२०१३ या दिवशी श्रीकृष्णाच्या चरणी आत्मनिवेदन करणार्‍या साधकांचा मी विचार करत होते. थोड्याच वेळात माझ्या मनात ‘मी एक बालसाधिका असून श्रीकृष्णाच्या कानात आत्मनिवेदन करत आहे’, असा विचार आला आणि त्याप्रमाणे मी अनुभवू लागले. त्यानंतर मी श्रीकृष्णाच्या खांद्यावर चढलेल्या आणि त्याचा कान शोधण्याचा प्रयत्न करून कानात काहीतरी सांगू पहाणार्‍या बालसाधिकेचे चित्र काढले.

२ अ. चित्रातून शिकायला मिळालेली सूत्रे

१. भाव आणि प्रामाणिकपणा असणार्‍या साधकांनी बोलावल्यावर श्रीकृष्ण त्वरित धावून येतो ! : श्रीकृष्ण सूक्ष्म रूपात सर्वत्र वास करतो आणि तो प्रत्येक साधकासमवेतही असतो. त्याला कान आहेत आणि तो सर्व ऐकूही शकतो. भाव अन् प्रामाणिकपणा असणार्‍या साधकांनी बोलवल्यावर तो त्वरित येतो.

२. भगवंत सर्वत्र असल्यामुळे आपण त्याच्यापासून काहीच लपवू शकत नाही ! : बालसाधिकेतील भाव आणि तळमळ यांमुळे ती प्रामाणिकपणे सर्वकाही श्रीकृष्णाच्या कानात सांगते. तिचा भोळा भाव ओळखून श्रीकृष्णाच्या मुखावर हास्य उमलते. ‘आपण नेहमी प्रामाणिक असले पाहिजे. भगवंत सर्वत्र असल्यामुळे आपण त्याच्यापासून काहीच लपवू शकत नाही’, हे यातून शिकायला मिळाले.

३. आत्मनिवेदन केल्यावर आपण भगवंताच्या अधिक जवळ जात असल्याने तो आपल्याला साहाय्य करतो ! : आत्मनिवेदन केल्यावर आपण भगवंताच्या अधिक जवळ जातो. आपण सांगितलेले तो ऐकतो आणि आपल्याला साहाय्यही करतो; परंतु कित्येकदा आपल्याला याची जाणीव नसते. प्रत्येक प्रसंगातून आपल्याला शिकायला मिळते आणि भाववृद्धीही होते. भगवंत नेहमी आपल्या अडचणी ऐकून मार्गदर्शन करतो; म्हणून आपण त्याचे ऐकले पाहिजे आणि त्याने सांगितल्याप्रमाणे कृतीही केली पाहिजे.

– (पू.) सौ. योया वाले, युरोप, एस्.एस्.आर्.एफ्. (१५.८.२०१३)