कु. आनास्तासिया वाले आणि फुलपाखरू यांच्यातील अभूतपूर्व प्रेमळ मैत्रीचे आध्यात्मिक पैलू !

सात वर्षांची कु. आनास्तासिया वाले ही बालसाधिका फुलपाखरांशी मोकळेपणाने खेळते. तिची फुलपाखरांशी मैत्री असल्यामुळे ती त्यांच्याशी बोलते, त्यांना गोष्टी सांगते, गाणी म्हणते आणि आईच्या मायेने त्यांना कुरवाळून त्यांची पापीही घेते. फुलपाखरेही तिला स्पर्श करू देतात आणि फुलांवर बागडल्याप्रमाणे ती तिच्या अंगा-खांद्यावर सहजेतेने खेळतात.

जगात कुठेही पहायला मिळणार नाही, अशा फुलपाखरू आणि आनास्तासिया यांच्या अभूतपूर्व प्रेमळ मैत्रीच्या जोडीचे ध्वनीचित्रीकरण मार्गशीर्ष शु. ४, कलियुग वर्ष ५११३ (२८.११.२०११) या दिवशी सायंकाळी ६.३० ते ९.१० या कालावधीत सनातनच्या रामनाथी आश्रमात करण्यात आले. याविषयीची ध्वनीचित्रफीत खाली दिली आहे.

Courtesy : ssrf.org

कु. आनास्तासिया आणि फुलपाखरू यांच्यातील प्रेमळ मैत्रीचे आध्यात्मिक पैलू उलगडणारे श्रीकृष्णाने दिलेले ज्ञान !

फुलपाखरे सात्त्विक असल्याने ती सात्त्विक गोष्टींकडे आकृष्ट होणे

कीटकांमध्ये रेशमाचे किडे आणि फुलपाखरे सर्वांत सात्त्विक असल्याने त्यांची ओढ सात्त्विक वनस्पती, माणसे आणि सात्त्विक वातावरण यांच्याकडे असते. फुलांना येणारा सुगंध, त्यांचा रंग आणि त्यांतील पराग यांमुळे वनस्पतींमध्ये फुले सर्वांत सात्त्विक असल्याने फुलपाखरे फुलांकडे आकृष्ट होतात.

कु. आनास्तासियाकडे फुलपाखरू खेचले जाण्यामागील कार्यकारणभाव

कलियुगात जन्माला आलेल्या मनुष्यांपैकी बहुतांश मनुष्य भुवर्लोक आणि पाताळ येथून जन्माला आलेले आहेत. त्यामुळे रज-तमप्रधान असलेल्या मनुष्याभोवतीचे वायूमंडलही रज-तमप्रधान आहे. कु. आनास्तासिया ही उच्च स्वर्गलोकातून आलेली आहे. तिच्या लिंगदेहाभोवती तेथील सात्त्विक, सुखमय आणि सुगंधदायी वायूमंडल असल्याने या वायूमंडलाकडे फुलपाखरू खेचले गेले.

कु. आनास्तासियाकडे फुलपाखरू प्रदीर्घ काळ रहाणे आणि
तिच्या अंगाखांद्यावर सहजतेने खेळणे यांमागील आध्यात्मिक कारण

कु. आनास्तासियाने उच्च स्वर्गलोकात चित्रकला, तसेच संगीत, नृत्य आणि अभिनय या कलांचा वापर ईश्वरप्राप्तीसाठी साधना म्हणून केल्याने तिच्यात जन्मतःच साधकत्व आहे. तिच्यामध्ये जिज्ञासा, निर्मळता, प्रांजळपणा, प्रेमभाव आणि भाव हे दैवी गुण आहेत. ती जीव-जीवात्मा दशेत असल्यामुळे तिच्या अंतर्मनात आनंद जाणवतो. या आनंदाची स्पंदने तिच्या तोंडवळ्यावर स्पष्टपणे उमटलेली दिसतात आणि ती तिच्या भोवतीच्या वायूमंडलात प्रसारित होतात. त्यामुळे फुलपाखराला ‘अनास्तासियाकडे यावे’, असे वाटले आणि ते प्रदीर्घ काळ तिच्याजवळ थांबले. तिच्यातील प्रेमभावामुळे फुलपाखरू सहजतेने तिच्या अंगाखांद्यावर बागडून तिला स्पर्शही करू देत होते.

कु. आनास्तासियातील वात्सल्यभाव दर्शवणारी काही उदाहरणे

१. कु. आनास्तासिया फुलपाखराला मंजुळ आवाजात ‘बाळा… बाळा…’ अशी प्रेमाने हाक मारते.
२. ती फुलपाखराला अलगदपणे उचलून स्वतःच्या अंगावर ठेवते.
३. फुलपाखराशी खेळतांना ‘त्याला भूक लागली का, झोप आली का’, अशा प्रकारे त्याची काळजी घेते.
४. फुलपाखराला श्रीकृष्णाची गोष्ट सांगते.
५. फुलपाखराला झोप लागण्यासाठी आपल्या तळहातांचा पाळणा करून त्यात फुलपाखराला झोपवून त्याला झोका देते आणि ‘बाळा जो जो रे’ हा श्रीकृष्णाचा पाळणा अन् इतर अंगाईगीते गाते.

कु. आनास्तासियातील आध्यात्मिक प्रगल्भता

साधनेमुळे आध्यात्मिक पाया सिद्ध असल्याने कु. आनास्तासिया तिच्या वयाच्या तुलनेत पुष्कळ प्रगल्भ असल्याचे अनेक प्रसंगांतून स्पष्टपणे जाणवते. ती देवाच्या अनुसंधानात असल्यामुळे तिला देवाचे विचार ग्रहण करता येतात.

फुलपाखरू काय खाते, असा तिला प्रश्न पडतो. तसेच ‘फुलपाखराला बसण्यासाठी आणि जेवण्यासाठी विविध फुले आणली पाहिजेत. ‘फुलपाखरू माझे ओठ आणि गाल यांवर बसून पापी घेत आहे. त्याच्या जिभेने ते मला चाटत आहे. फुलपाखरू लवकरच मरणार आहे; म्हणून त्याला सोडून देऊया’, हे तिचे बोलणे तिच्यातील आध्यात्मिक प्रगल्भतेचे निदर्शक आहे.

भावामुळे फुलपाखराची भाषा समजणे आणि त्याच्याशी संभाषण करता येणे

कु. आनास्तासियातील भाव, तळमळ आणि मनाची निर्मळता यांमुळे ती फुलपाखराला पुढील आध्यात्मिक स्तरावरील प्रश्न विचारते. ‘श्रीकृष्ण कोण आहे ? तुला माझ्याजवळ रहायचे कि प.पू. डॉक्टरांकडे जायचे ? तुला श्रीकृष्णाकडे जायचे आहे का ? श्रीकृष्णाची खोली आकाशात आहे’ आणि फुलपाखराने तिला दिलेली उत्तरे इतरांना सांगते.

भाव आणि प्रेमभाव यांमुळे कु. आनास्तासियाला देवाचे साहाय्य मिळणे,

देवाच्या कृपेमुळे तिच्या दैनंदिन कृतींमध्ये मांत्रिकाचा हस्तक्षेप न्यून होणे

कु. आनास्तासियातील भाव आणि प्रेमभाव यांमुळे देवाने ती अन् फुलपाखरू यांच्या भोवती संरक्षककवच निर्माण केले. जेव्हा ती फुलपाखराशी खेळत होती, तेव्हा तिला त्रास देणार्‍या मांत्रिकाला ती आणि फुलपाखरू यांना त्रास देता आला नाही. तिच्यातील भाव आणि प्रेमभाव यांमुळे तिच्यावर देवाच्या कृपेचा वर्षाव वाढला आहे. त्यामुळे तिच्या दैनंदिन कृतींमध्ये मांत्रिकाचा हस्तक्षेप न्यून झाला आहे.

कु. आनास्तासियाच्या रूपाने भगवंताने साधकांना ‘शकुंतला’ भेट म्हणून देणे

कण्वमुनी आणि त्यांची पत्नी यांना मूलबाळ नसल्याने त्यांनी शकुंतलेचा सांभाळ करून तिचे पालनपोषण केले. ऋषी विश्वामित्र आणि मेनका यांची सुकन्या शकुंतला हिचे संपूर्ण बालपण अन् तारुण्य कण्वमुनींच्या आश्रमात गेले. वनातील आश्रमाच्या परिसरातील पशू-पक्षी आणि वृक्ष-लता शकुंतलेशी बोलत असत. हरिण, मोर, भारद्वाज आणि राजहंस तिच्या जवळ येत असत आणि शकुंतला त्यांना प्रेमाने कुरवाळत असे. शकुंतलेशी खेळतांना हरिण तिच्या साडीचा पदर दातात धरून खेचत असे, तर कधी तिला पाहून हर्षित होऊन टण-टण उड्या मारत असे. तिला पाहून आनंदित झालेला मोर पिसारा फुलवून नाचत असे, तर शकुंतलेच्या दर्शनाने कोकीळ मंजूळ गायन करत असे. शकुंतला एखाद्या पायवाटेने जातांना लतांच्या शाखा खाली वाकून तिला भेटण्यासाठी बिलगायच्या आणि वृक्ष त्यांच्या डहाळ्या हलवून तिच्यावर फुलांचा वर्षाव करायचे अन् ते पानांच्या सळसळण्याचा ध्वनी करून आनंद व्यक्त करायचे. शकुंतला उच्च स्वर्गलोकातील जीव असल्याने तिच्या भोवतीच्या सात्त्विक, सुगंधमय वायूमंडलाकडे आणि तिच्यातील भाव, प्रेमभाव अन् मनाची निर्मळता या दैवी गुणांमुळे तिच्याकडे पशू-पक्षी आणि वृक्ष-लता आकृष्ट होत होते.

कलियुगात भगवंताने कु. आनास्तासियाच्या रूपाने साधकांना ‘शकुंतला’च भेट म्हणून दिली आहे. आनास्तासिया फुलराणी आहे.

आली फुलराणी, अना-फुलराणी …

फुलपाखरांशी खेळणारी,
बालहट्ट करणारी,
फुलांवर प्रेम करणारी,
सर्वांना आनंद देणारी,
कोमला पुष्पराणी,
आली फुलराणी, अना-फुलराणी ।। १ ।।

फुलांनी सजणारी,
फुलपाखरांनी नटणारी,
नाचत-गात बागडणारी,
सर्वांना मोहून टाकणारी,
लाडकी मधुराणी,
आली फुलराणी, अना-फुलराणी ।। २ ।।

फुलांप्रमाणे फुलणारी,
फुलपाखरांना कुरवाळणारी,
सुगंधी रातराणी,
अवतरली स्वर्गराणी,
आली परीराणी,
आली फुलराणी, अना-फुलराणी ।। ३ ।।

कु. आनास्तासियातील भावामुळे तिने प.पू. डॉक्टरांना बोलावल्यावर त्यांनी येऊन फुलपाखराशी खेळणे

कु. आनास्तासियातील भावामुळे तिने हात धरून बोलावल्यावर प.पू. डॉक्टर तिच्यासमवेत आले आणि तेही फुलपाखराशी खेळले. प.पू. डॉक्टरांनी फुलपाखराला कुरवाळून त्याचे लाड करून त्याची पापी घेतली. तेव्हा आनास्तासियाला आनंद झाला. फुलपाखराला ओंजळीत अलगदपणे उचलतांना प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘फुलपाखरू माझाही मित्र आहे आणि तूही माझी मैत्रीण आहेस’’, तेव्हा कु. आनास्तासिया खळखळून हसली.

फुलपाखराकडे पहातांना कु. आनास्तासियाची आई सौ. योया वाले

कु. आनास्तासियाची आई सौ. योया वाले याही उच्च स्वर्गलोकातील कलाकार जीव असल्याने त्यांच्याकडेही फुलपाखरू आकृष्ट झाले.’

– श्रीकृष्ण (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, मार्गशीर्ष शु. १०, कलियुग वर्ष ५११३ (४.१२.२०११, रात्री ९.३१))

कु. अनास्तासिया आणि फुलपाखरू यांच्या प्रेमळ जोडीविषयीचे टंकलेखन करतांना आनंद जाणवणे

‘कु. आनास्तासिया फुलपाखराशी खेळतांनाचे ध्वनीचित्रीकरण चालू असतांना देवाच्या कृपेने मला त्यांची प्रेमळ मैत्री प्रत्यक्ष पहाण्याची संधी मिळाली. फुलपाखराशी तिचे वागणे, बोलणे पहातांना मला आनंद जाणवत होता. ध्वनीचित्रीकरणाचे संकलन करतांना आणि तिच्या संदर्भातील धारिकेचे टंकलेखन करतांनाही आध्यात्मिक उपाय होऊन आनंद जाणवत होता.’ – कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

कु. आनास्तासियाचे प्रसंगावधान

वरील प्रसंगाचे चित्रीकरण करण्यासाठी कु. आनास्तासिया ध्वनीचित्रीकरण कक्षात गेली. तिचे ध्वनीचित्रीकरण चालू असतांना तिची आई योया ते पहाण्यास गेली. तेव्हा तिने ते फुलपाखरू आईच्या हातात दिले. त्याचेही ध्वनीचित्रीकरण करणार आहेत, हे लक्षात आल्यावर तिने आईला वाकायला सांगितले आणि आईचे केस नीट केले.’ – डॉ. आठवले (मार्गशीर्ष शु. १/२, कलियुग वर्ष ५११३ (२६.११.२०११))


स्वर्गलोकातून आलेल्या जिवांमध्ये विशेष सौंदर्यदृष्टी असणे आणि प्रत्येक घटकातील ईश्वरी सौंदर्याला कसे

जपायचे याबद्दलही त्यांना विशेष ज्ञान असणे, यांचे उदाहरण म्हणजे कु. आनास्तासिया हिचे फुलपाखराशी वागणे

प.पू. डॉ. आठवले : अनास्तासियाच्या अंगावर एक फुलपाखरू एक-दोन तास बसून होते. इतरांमुळे ते उडून दूर गेले, तरी अनास्तासिया तिच्या हातांच्या ओंजळीत त्याला हळुवारपणे घेते. त्याच्या पंखाला धरून ती उचलत नाही; कारण त्याचे पंख दुखावतील. यासंदर्भात माहिती हवी.

सूक्ष्म-जगतातील एक विद्वान : स्वर्गलोकातून आलेल्या जिवांना बाह्य जगतातील ईश्वरी सौंदर्याला कसे जपायचे,

त्याला कसे न्याहाळायचे, या बद्दल विशेष ज्ञान असणे आणि असेच ज्ञान कु. आनास्तासियाला असणे

कु. आनास्तासियाच्या अंतरात कलेचे बीज दडलेले आहे. तिच्यात जन्मतःच साधक-कलाकाराची वृत्ती मुरलेली असल्याने तिची दृष्टीही आध्यात्मिक पैलूंमधील ईश्वरी सौंदर्य टिपणारी आहे. साधक-कलाकार जीव मनाने हळवे, तसेच अत्यंत भावूक असतात. त्यांना बाह्य जगतातील ईश्वरी सौंदर्याला कसे जपायचे, त्याला कसे न्याहाळायचे, याबद्दल विशेष ज्ञान असते. असेच ज्ञान या बालसाधिकेला असल्याने तिने फुलपाखराची विशेष काळजी घेतली. तिला त्याच्यातील दैवी सौंदर्य कसे जपायचे आणि त्याच्यावर प्रेम कसे करायचे हे कळले. फुलपाखरातील सूक्ष्म-जिवालाही तिचा प्रेमळ स्पर्श कळल्याने तसा त्याने तिला प्रतिसादही दिला.

स्वर्गलोकातून आलेल्या जिवांची वैशिष्ट्ये आणि त्यांचा संतपदाकडे होणारा प्रवास

१. कु. आनास्तासियासारखे स्वर्गलोकातील जीव सौंदर्यात रमणारे, त्यात स्वतःला हरवून घेणारे असतात.
२. ज्या वेळी त्यांच्यातील साधक-कलाकार जागृत होतो, त्या वेळी त्यांना त्यांच्या सौंदर्यदृष्टीतूनच ईश्वराच्या मूळ नैसर्गिक प्रकृतीचा साक्षात्कार होतो.
३. तेजरूपाने ईश्वरी सौंदर्याच्या प्रकटीकरणात त्यांना विविध प्रकाशाने युक्त असणारे दैवी रंग दिसू लागतात आणि या रंगांना ते आपल्या दृष्टीपटलावर जिवापाड जपतात.
४. पुढे हेच रंग त्यांच्या साधनेतही उतरतात आणि मग खर्‍या अर्थाने त्यांचा महर्लोकाकडे प्रवास चालू होतो.
५. यातूनच शिष्य-कलाकार घडतो आणि यथावकाश तो पुढे गुरूंच्या कृपाछत्राखाली संतपद प्राप्त करून आपल्या जन्माचे सार्थक करून घेतो.

(सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, मार्गशीर्ष शु. ७, कलियुग वर्ष ५११३ (१.१२.२०११), सायं. ६.०८)


/*
This Code Free To Use – Providing This Notice Remains
Flying Butterfly script (By [email protected])
Modified slightly/ permission granted to DesignerWiz.com to feature script in archive
JavaScript Code Effect Found At: Development Resource & JavaScript Code & Generator Public Archive Center
Located: http://www.DesignerWiz.com
Though This Material May Have Been In A Public Depository, Certain Author Copyright Restrictions May Apply*/

var Ymax=10; //MAX # OF PIXEL STEPS IN THE “X” DIRECTION
var Xmax=10; //MAX # OF PIXEL STEPS IN THE “Y” DIRECTION
var Tmax=5000; //MAX # OF MILLISECONDS BETWEEN PARAMETER CHANGES

//FLOATING IMAGE URLS FOR EACH IMAGE. ADD OR DELETE ENTRIES. KEEP ELEMENT NUMERICAL ORDER STARTING WITH “0” !!

var floatimages=new Array();
floatimages[0]=’http://hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/wp-content/uploads/sites/4/2015/01/1341309697_bluebutterfly.gif’;
floatimages[1]=’http://hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/wp-content/uploads/sites/4/2015/01/1341309747_orangenew1.gif’;
floatimages[2]=’http://hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/wp-content/uploads/sites/4/2015/01/1341309867_pinkbutterfly.gif’;
var floatimagesf=new Array();
floatimagesf[0]=’http://hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/wp-content/uploads/sites/4/2015/01/1341309726_bluebutterfly_flip.gif’;
floatimagesf[1]=’http://hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/wp-content/uploads/sites/4/2015/01/1341309848_orangenew1_flip.gif’;
floatimagesf[2]=’http://hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/wp-content/uploads/sites/4/2015/01/1341309885_pinkbutterfly_flip.gif’;

//*********DO NOT EDIT BELOW***********
var NS4 = (navigator.appName.indexOf(“Netscape”)>=0 && parseFloat(navigator.appVersion) >= 4 && parseFloat(navigator.appVersion) = 5 && navigator.appName.indexOf(“Netscape”)>=0 )? true: false;
var wind_w, wind_h, t=”, IDs=new Array();
for(i=0; i<floatimages.length; i++){
t+=(NS4)?'‘ : ‘

‘;
}
document.write(t);

function flipImage(i)
{
var holder = document.getElementById(“imageHolder”+i);
holder.innerHTML = ‘
}

function normalImage(i)
{
var holder = document.getElementById(“imageHolder”+i);
holder.innerHTML = ‘
}

function moveimage(num){
if(getidleft(num)+IDs[num].W+IDs[num].Xstep >= wind_w+getscrollx())IDs[num].Xdir=false;
if(getidleft(num)-IDs[num].Xstep= wind_h+getscrolly())IDs[num].Ydir=false;
if(getidtop(num)-IDs[num].Ystep0;
IDs[num].Xdir=Math.floor(Math.random()*2)>0;
IDs[num].Ystep=Math.ceil(Math.random()*Ymax);
IDs[num].Xstep=Math.ceil(Math.random()*Xmax)
setTimeout(‘getnewprops(‘+num+’)’, Math.floor(Math.random()*Tmax));
}

function getscrollx(){
if(NS4 || NS6)return window.pageXOffset;
if(IE4)return document.body.scrollLeft;
}

function getscrolly(){
if(NS4 || NS6)return window.pageYOffset;
if(IE4)return document.body.scrollTop;
}

function getid(name){
if(NS4)return document.layers[name];
if(IE4)return document.all[name];
if(NS6)return document.getElementById(name);
}

function moveidto(num,x,y){
if(NS4)IDs[num].moveTo(x,y);
if(IE4 || NS6){
IDs[num].style.left=x+’px’;
IDs[num].style.top=y+’px’;
}}

function getidleft(num){
if(NS4)return IDs[num].left;
if(IE4 || NS6)return parseInt(IDs[num].style.left);
}

function getidtop(num){
if(NS4)return IDs[num].top;
if(IE4 || NS6)return parseInt(IDs[num].style.top);
}

function moveidby(num,dx,dy){
if(NS4)IDs[num].moveBy(dx, dy);
if(IE4 || NS6){
IDs[num].style.left=(getidleft(num)+dx)+’px’;
IDs[num].style.top=(getidtop(num)+dy)+’px’;
}}

function getwindowwidth(){
if(NS4 || NS6)return window.innerWidth;
if(IE4)return document.body.clientWidth;
}

function getwindowheight(){
if(NS4 || NS6)return window.innerHeight;
if(IE4)return document.body.clientHeight;
}

function init(){
wind_w=getwindowwidth();
wind_h=getwindowheight();
for(i=0; i<floatimages.length; i++){
IDs[i]=getid('pic'+i);
if(NS4){
IDs[i].W=IDs[i].document.images["p"+i].width;
IDs[i].H=IDs[i].document.images["p"+i].height;
}
if(NS6 || IE4){
IDs[i].W=document.images["p"+i].width;
IDs[i].H=document.images["p"+i].height;
}
getnewprops(i);
moveidto(i , Math.floor(Math.random()*(wind_w-IDs[i].W)), Math.floor(Math.random()*(wind_h-IDs[i].H)));
if(NS4)IDs[i].visibility = "show";
if(IE4 || NS6)IDs[i].style.visibility = "visible";
startfly=setInterval('moveimage('+i+')',Math.floor(Math.random()*100)+100);
}
}

function hidebutterfly(){
for(i=0; i<floatimages.length; i++){
if (IE4)
eval("document.all.pic"+i+".style.visibility='hidden'")
else if (NS6)
document.getElementById("pic"+i).style.visibility='hidden'
else if (NS4)
eval("document.pic"+i+".visibility='hide'")
clearInterval(startfly)
}
}

if (NS4||NS6||IE4){
window.onload=init;
window.onresize=function(){ wind_w=getwindowwidth(); wind_h=getwindowheight(); }
}