परीक्षेला सहजपणे कसे सामोरे जावे ?


१. आजचा विद्यार्थी हा केवळ परीक्षार्थी झालेला असणे

‘एखाद्या गोष्टीचा अभ्यास करणे, म्हणजे त्या विषयाचे नुसते वाचन करणे, असेनसून तो विषय पूर्ण समजून घेऊन कृतीत आणणे होय. बर्‍याचदा मुले एका इयत्तेतूनदुसर्‍या इयत्तेमध्ये जाण्यासाठी जे प्रयत्न करतात, त्याला आपण ‘अभ्यास’ म्हणतो; पणती केवळ परीक्षेचीच सिद्धता असते; कारण परीक्षा झाल्यावर कालांतराने त्या विषयांशीसंबंधित काही प्रश्न विचारल्यास मुलांना त्याची उत्तरे देता येत नाहीत. त्यामुळे आजचाविद्यार्थी हा केवळ परीक्षार्थी झालेला आहे.

२. मनातील परीक्षेची भीती किंवा चिंता कशी घालवाल ?

मुलांनो, परीक्षा जवळ आली की, आपल्या पोटात भीतीचा गोळा येतो. याचीकारणे नीट समजत नाहीत आणि समजली तरी पुढे काय करावे, तेच कळत नाही.त्यासाठी पुढील काही सूत्रे उपयोगी पडतील.

२ अ. परीक्षा आनंददायी होण्यासाठी हे करा !

१. स्वतःविषयी नकारात्मक विचार करू नका. असे नकारात्मक विचार किंवा मनाचागोंधळ झालेले विचार लिहून काढा आणि त्याविषयी आई-वडील यांच्याशी चर्चा करा.

२. स्वतःची क्षमता समजून घ्या, स्वतःची तुलना इतरांशी करू नका.

३. परीक्षेत मिळणारे गुण म्हणजेच सर्वस्व, असे समजू नका.

४. परीक्षेला जाण्यापूर्वी मारामारी, हत्या आदी प्रसंग असलेले कार्यक्रम पाहू नयेत.आनंदाचे क्षणआठवावेत.

५. घरचेच अन्नपदार्थ ग्रहण करा.

६. प्रत्येक विषयाच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवाव्यात, यामुळे तुमच्यामनातील परीक्षेची भीतीनिघून जाईल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल.

७. परीक्षेच्या प्रसंगाचा सराव करा.

मुलांनो, वरीलपैकी प्रत्येक गोष्ट तुमच्या आवाक्यातील आहे ना ! मग परीक्षाआणि ताण ?….. ते सगळं आता विसरायचं हं ! परीक्षेचा आनंद लुटा ! बुद्धीदेवता श्रीगणेशाच्या चरणी प्रार्थना करून अभ्यासाला लागा !’

आ. परीक्षेला जाण्यापूर्वी…….

१. परीक्षेला जाण्यापूर्वी दहा मिनिटे कुलदेवता / उपास्यदेवता यांचा नामजप करावाआणि त्यांना प्रार्थना करावी.

२. उत्तरपत्रिका लिहितांना उत्तर आठवत नसेल, तर प्रार्थना करावी.

३. देवच माझ्याकडून उत्तरपत्रिका लिहून घेत आहे, असा भाव ठेवावा.

– श्री. राजेंद्र पावसकर (गुरुजी), पनवेल
संदर्भ : सनातन-निर्मित-ग्रंथ ' अभ्यास कसा करावा? '