ध्वनीप्रदूषण

१. दुसर्‍या खोलीतील वाजलेला दूरध्वनी, दारावरची घंटा, तसेच चार जण एकाच वेळी बोलत असतांना त्यांचे संभाषण नीट ऐकू न येणे हा बहिरेपणाचाच एक प्रकार आहे. मुंबई, पुण्यासारख्या शहरांत तो अनेकांच्या संदर्भात आढळतो. लग्न, मिरवणुका, समारंभ यात केलेला ध्वनीवर्धकाचा वापर किंवा फटाके यांमुळे आपली श्रवणयंत्रणा बिघडते.

२. वाहतूक पोलिसांपैकी ८० टक्के काही प्रमाणात बहिरे का असतात, याचे उत्तर या प्रदूषणात आहे. – डॉ. यशवंत ओक (महाराष्ट्र टाईम्स)

३. मोठ्या आवाजात लावण्यात येणारे दूरदर्शनसंच, आकाशवाणी, उत्सव आणि सण यांनिमित्त लावले जाणारे ध्वनीवर्धक, कर्णकर्कशपणे वाजणारे भोंगे, इतकेच नव्हे, तर सार्वजनिक ठिकाणी चालणारे उच्च आवाजातील संभाषण या सर्व गोष्टींमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण होते. – प.पू. पांडे महाराज

ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी प्रशासनाने कडक भूमिका, तर नागरिकांनी जागरूकता दाखवणे आवश्यक !

बोलण्याच्या हक्कामध्येच दुसर्‍याच्या शांततेने जगण्याच्या हक्काची शाश्वती अंतर्भूत आहे. तुमचे विचार ऐकण्यासाठी ध्वनीक्षेपकाची सक्ती तुम्ही करू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने तर ‘झोपेचा हक्क हा मूलभूत हक्क आहे’, हे निर्विवादपणे ‘बुराबाजार फायर वर्क्स’ खटल्यामध्ये मान्य केले आहे. प्रशासनाने ध्वनीप्रदूषणाविषयी कडक अंमलबजावणीची भूमिका घेतली पाहिजे, तर नागरिकांनी पुरेशी जागरुकता दाखवून शांततेत जगण्याच्या हक्काच्या संरक्षणासाठी दक्ष राहिले पाहिजे.’

Leave a Comment